AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महत्वाच्या सोहळ्यात कारपेट नेहमी रेडच का असतं ? पिवळं किंवा इतर रंगाचं का नसतं ?

रेड कारपेट अंथरणं म्हणजे आता कॉमन झालं आहे. नेहमीच पाहूण्यांच्या स्वागताला लाल गालिचा अंथरला जातो. ऑस्कर पुरस्कार असो किंवा मंत्री किंवा पुढाऱ्याचं स्वागत नेहमीच राजकीय आणि इतर सोहळ्यात रेड कारपेटला महत्व दिलं जातं. मात्र यामागे लालच रंग का ? त्याचा काय आहे इतिहास पाहूयात...

महत्वाच्या सोहळ्यात कारपेट नेहमी रेडच का असतं ? पिवळं किंवा इतर रंगाचं का नसतं ?
red carpetImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Nov 24, 2023 | 3:07 PM
Share

मुंबई | 24 नोव्हेंबर 2023 : ऑस्कर पुरस्कार सोहळा असो किंवा कोणताही सोहळा नेहमीच रेड कारपेट अंथरला जातो. कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्येही रेड कारपेटवर तारकांची मांदियाळी अवतरलेली असते. जेव्हा विशेष पाहूण्याचं स्वागत करण्याची वेळ येते तेव्हा नेहमी त्यांच्या दिमतीला रेड कारपेट अंथरलं जात असते. रेड कारपेट आणि महनीय व्यक्तींच्या स्वागताचा संबंध काय असा सवाल नेहमीच आपल्याला पडतो. एवढंच काय परदेशातूनही कोणी मंत्री किंवा पुढारी भारताच्या राजकीय भेटीवर येतो तेव्हा त्याचं स्वागत लाल गालिचा अंथरुणचे केले जाते. या कारपेटचा रंग नेहमी लालच असतो. पिवळा किंवा निळा नसतो ?

रेड कारपेटचा इतिहास ?

वास्तविक रेड कारपेटचा इतिहास युनानी नाटक अगामेमनॉन याच्याशी जोडलले आहे. यात या रंगाचा वापर नेहमी खास लोकांसाठी झालेला आहे. बीबीसीच्या एका लेखात लंडनच्या व्हिक्टोरीया आणि अल्बर्ट म्युझियमच्या क्यूरेटर सॉनेट स्टॅनफिल यांनी म्हटलंय रेड कारपेटला नेहमी राजेमहाराजांशी जोडलेलं पाहायला मिळतं. रेड कारपेटशी संबंधी एक घटना आहे. साल 1821 अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेम्स मनरो जेव्हा कॅलिफोर्नियाच्या जॉर्जटाऊन शहरात पोहचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी रेड कारपेट अंथरले गेले होते.

हळूहळू सर्वमान्य झालं

1922 मध्ये रॉबिन हूड चित्रपटाच्या प्रिमियरसाठी इजिप्तिशियन थिएटर समोर एक लांबलचक रेड कारपेट अंथरले होते. त्यानंतर यावर तारे आणि तारकांची परेड झाली. ज्याला खूप पसंद केले गेले होते. 1961 मध्ये प्रथमच एकेडमी अवॉर्ड्स समारंभासाठी रेड कारपेट अंथरले गेले. या कारपेटला खास तयार केले गेले होते. हळूहळू पाहूण्यांच्या स्वागताला रेड कारपेट अंथरण्याची परंपरा तयार झाली. आज रेड कारपेट अंथरणे सर्वमान्य झाले आहे.

सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.