AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्याही हॉटेलमध्ये 13 वा मजला किंवा 13 क्रमांकाची रूम का नसते? कारण जाणून विश्वास बसणार नाही

तुम्हाला माहितीये का की बऱ्याचशा हॉटेल्समध्ये 13 वा मजला किंवा 13 क्रमांकाची रुम नसते. भारतातीलही अनेक हॉटेल्समध्ये हा ट्रेंड दिसतो. कारण आहे 13 नंबरची भीती. पण का? बऱ्याच जणांना याचं कारण माहित नसेल. जाणून घ्या.

कोणत्याही हॉटेलमध्ये 13 वा मजला किंवा 13 क्रमांकाची रूम का नसते? कारण जाणून विश्वास बसणार नाही
13th floor Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 26, 2025 | 9:31 PM
Share

आपण बाहेर फिरायला वैगरे गेलो तर राहण्यासाठी हॉटेल हा एक पर्याय असतोच.पण तुम्ही कधी एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? की, कोणत्याही हॉटेलमध्ये 13 वा मजला नसतो आणि नाही 13 नंबरची रुम. जगातील अनेक हॉटेल्स किंवा जवळजवळ सर्व हॉटेल्समध्ये 13 वा मजला किंवा रुम नंबर 13 नसते. याचं कारण जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

13 नंबरबद्दलची भीती

जगात असे बरेच लोक असतात ज्यांना 13 क्रमांकाची भीती वाटते. या भीतीमुळे 13 क्रमांक हॉटेल्समध्ये किंवा त्या हॉटेलच्या लिफ्टमध्येही हा नंबर समाविष्ट नसतो. या भीतीला ट्रिस्काइडेकाफोबिया म्हणतात. जगातील अनेक देशांमध्ये लोक 13 क्रमांकाला अशुभ मानतात. अनेक ठिकाणी, 13 हा आकडा भूत आणि आत्म्यांशी देखील जोडला जातो. ज्यांना या फोबियाचा त्रास असतो त्यांना 13 हा आकडा पाहून भीती वाटते.

म्हणून 13 क्रमांक काढून टाकण्यात आला आहे

जर तुम्ही कधी 12 पेक्षा जास्त मजल्यांच्या मोठ्या हॉटेलमध्ये राहिला असाल, तर तुमच्या लक्षात आले असेल की त्या हॉटेलला 13 क्रमांकाचा मजला नसतो. जगात अशी अनेक हॉटेल्स आहेत जी 12 व्या मजल्यानंतरच्या मजल्याला 13 हा क्रमांकच देत नाहीत. हॉटेलच्या लिफ्टमध्येही तुम्हाला 12 नंतर 13 हा आकडा लिहिलेला आढळणार नाही. यामागे कारण ट्रिस्काइडेकाफोबिया हेच असतं.

ट्रिस्काइडेकाफोबिया म्हणजे काय?

ट्रिस्काइडेकाफोबियाने ग्रस्त असलेले लोक 13 हा आकडा पाहून घाबरतात. हे पाहून त्याची चिंता वाढते आणि त्याला घाम येऊ लागतो. बरेच लोक असा दावा करतात की हा आकडा पाहिल्यावर त्यांचे हृदय जास्त वेगाने धडधडू लागते. म्हणून, हॉटेल मालक त्यांच्या हॉटेलमधून 13 क्रमांक काढून टाकण्यासाठी 13 व्या मजल्याचा क्रमांक बदलतात. यामुळे ट्रिस्काइडेकाफोबियाने त्रस्त असलेले अनेक लोक असेही म्हणतात की जर त्यांनी हॉटेलमध्ये 13 क्रमांकाची रुम बुक केली तर त्यांचे काम बिघडते.

13 क्रमांक वगळण्यात आला

प्रत्यक्षात, 12 पेक्षा जास्त मजले असलेल्या इमारतीतून 13 वा मजला प्रत्यक्षात गायब होऊ शकत नाही. मजल्यांची मोजणी करताना, 13 वा मजला हा असतोच पण त्याला 13 हा क्रमांक न देता दुसरा क्रमांक दिला जातो किंवा नाव दिलं जातं. बऱ्याच हॉटेल्समध्ये, 12 नंतरच्या मजल्यांना 12A किंवा 14A असे नंबर दिले जातात. तर अनेक ठिकाणी, 12 व्या मजल्यानंतरच्या मजल्याला 13 हा आकडा न देता थेट 14 हा क्रमांक दिला जातो. आजकाल भारतातील अनेक हॉटेल्समध्येही हा ट्रेंड दिसून येतो.

त्यामुळे तुम्ही कधी कोणत्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी जाल तेव्हा त्या हॉटेलमध्ये 13 नंबर आहे का किंवा दुसऱ्या काही नावाने तो मजला आहे का हे कुतूहल म्हणून तरी नक्की पाहा.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.