AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 वर्षात तुम्हीही बनू शकता करोडपती, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा

How to Become Rich: करोडपती होण्याची इच्छा अनेकांना असेल. पण यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा हे अनेकांना माहित नसते. अनेक जण वेगवेगळ्या मार्गातून पैसे कमवतात. वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगणार आहोत. जिथे तुम्ही गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहू शकता.

15 वर्षात तुम्हीही बनू शकता करोडपती, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा
how-to-become-rich
| Updated on: Nov 06, 2023 | 6:54 PM
Share

मुंबई : जर तुम्हाला चांगले गुंतवणूकदार व्हायचे असेल आणि शक्य तितक्या लवकर मोठा निधी उभारायचा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड हा पर्याय निवडू शकतात. हा एक उत्तम पर्याय आहे. SIP द्वारे तुम्ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास तुम्ही नक्कीच करोडपती होऊ शकता. मार्केट लिंक्ड असल्‍यामुळे, SIP मध्‍ये खात्रीशीर परतावा मिळत नाही. त्याचा परतावा बाजारावर आधारित असतो. परंतु दीर्घ मुदतीत तो 15 आणि 20 टक्के परतावा देखील देऊ शकतो. त्याचा सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो. याशिवाय तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो.

अलीकडच्या काळात SIP गुंतवणुकीवर मोठ्या संख्येने लोक विश्वास ठेवत आहेत. SIP ही FD पेक्षा जास्त परतावा देत आहे. SIP मध्ये धोका असतो. पण त्यातून मोठा परतावा मिळण्याची देखील शक्यता असते. कोणत्या म्युच्युअल फंडात पैसे लावायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेक कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे.  ज्यामुळे गुंतवणुकदार करोडपती झाले आहेत.

जर तुम्हाला SIP च्या मदतीने कमी कालावधीत करोडपती व्हायचे असेल तर तुम्ही 15X15X15 चा फॉर्म्युला लक्षात ठेवला पाहिजे. 15X15X15 चा फॉर्म्युला तुम्हाला करोडपती कसा बनवेल. चला जाणून घेऊया.

15X15X15 नुसार तुम्हाला 15 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 15,000 रुपये गुंतवावे लागतील ज्यामध्ये तुम्हाला 15 टक्के दराने व्याज मिळेल असे समजा. SIP मध्ये गुंतवणूक केल्यानंतर SIP तून तुम्हाला 15 टक्के पर्यंत परतावा मिळू शकतो.

जर तुम्ही 15X15X15 चा फॉर्म्युला स्वीकारून SIP मध्ये गुंतवणूक केली, तर 15,000 रुपये दरमहा दराने, तुम्ही 15 वर्षांत एकूण 27,00,000 रुपये गुंतवतात. यावर जर आपण 15 टक्के दराने व्याज दिले तर ही रक्कम 74,52,946 इतकी होते. अशाप्रकारे, गुंतवलेली रक्कम आणि व्याज यांची सांगड घालून 15 वर्षांत तुम्ही 1,01,52,946  रुपये जमा करु शकता.

sip

sip

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.