AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Festival Offer : दसरा, दिवाळीत Jeep Compass वर 1.5 लाखांची सूट

या दसरा, दिवाळीमध्ये जर तुम्ही नवीन कार घेत असाल तर जीप इंडियाने तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर आणली आहे (Jeep Compass Festival Offer).

Festival Offer : दसरा, दिवाळीत Jeep Compass वर 1.5 लाखांची सूट
| Edited By: | Updated on: Oct 16, 2020 | 3:20 PM
Share

मुंबई : या दसरा, दिवाळीमध्ये जर तुम्ही नवीन कार घेत असाल तर जीप इंडियाने तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर आणली आहे (Jeep Compass Festival Offer). ज्यामध्ये 1.5 लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. पण ही कार विकत घेण्यासाठी काही नियम व अटी आहेत. जीप कंपासने अधिक माहिती दिलेली नाही की, कशा प्रकारे ग्राहकांना कार खरेदी केल्यावर 1.5 लाखांचा फायदा होणार. भारतात एसयूव्हीच्या Jeep Compass Sports Plus मॉडलची किंमत 16.49 लाख रुपये आहे (Jeep Compass Festival Offer).

6 मॉडलमध्ये 15 व्हेरिअंट

भारतात कंपासच्या SPORT PLUS, NIGHT EAGLE, LONGITUDE, LONGITUDE PLUS, LIMITED PLUS आणि TRAILHAWK मॉडल मिळत आहे. यामध्ये स्पोर्टस प्लसची किंमत 16.49 लाख रुपयापासून सुरु होत आहे. तर नाईट ईगल मॉडलची किंमत 19.95 लाख रुपयापासून सुरु होत आहे. तसेच जीप कंपासच्या लॉन्गिट्यूडची किंमत 19.40 लाख रुपयांपासून सुरु होत आहे.

टॉप मॉडलची किंमत 26.28 लाख

कंपासच्या लॉन्गिट्यूड प्लस मॉडलची किंमत 19.69 लाख रुपयापासून सुरु होत आहे. जीप कंपासच्या लिमिटेड प्लस मॉडलची किंमत 21.92 लाख रुपयापासून सुरु होत आहे आणि टॉप मॉडलच्या ट्रेलहॉकची किंमत 26.80 लाख रुपयापासून सुरु होत आहे. या मॉडलचे अनेक व्हेरिअंट्सच्या वेगवेगळ्या किंमती आहेत. ज्यामध्ये काही नियम व अटी जोडलेले आहेत. जीप कंपासचे भारतात 15 व्हेरिअंट्स आहेत. जे वेगवेगळ्या कलर ऑप्शनसोबत आहेत.

जीप कंपासच्या एसयूव्हीमध्ये डिझेल आणि पेट्रोल दोन्ही ऑप्शन आहेत. 2.0 लीटर डीझेल इंजन 1956 सीसी पॉवरसह आणि 1.4 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1368 सीसी पॉवरसह जीप कंपास मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही बाजूने ट्रान्समिशनमध्ये आहे. 5 सीटर एसयूव्ही जीप कंपासचे मेजरमेंट पाहिले तर, या कारची लांबी 4395mm, रुंदी 1818mm आणि व्हील बेस 2636mm आहे. कंपनीने दावा केला की, 14.01 ते 18.01 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते.

जीप कंपासचे फीचर्स

जीप कंपनीचे फीचर्स पाहिले तर, यामध्ये 7 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्रायव्हर आणि पॅसेंजर सेफ्टी एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, एपीएस, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, कीलेस एण्ट्री, पुश बटन स्टार्ट-स्टॉप, ड्युअल क्लायमेट कंट्रोल, अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले सह इतर फीचर्स आहेत.

संबंधित बातम्या : 

BMW ची सर्वात किफायतशीर सेडान लाँच, किंमत फक्त…

अनलॉकचा ऑटो क्षेत्राला फायदा, सप्टेंबरमध्ये 2500 पेक्षा अधिक इलेक्ट्रिक बाईकची विक्री

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.