AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानाने दिल्लीहून नागपुरात आलेले 12 प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह , मनपा प्रशासन अलर्ट

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये दिल्लीहून विमानाने आलेले 12 प्रवासी कोरोना बाधित निघाले आहेत. त्यामुळे नागपूर मनपा प्रशासन अलर्ट झाले आहे.

विमानाने दिल्लीहून नागपुरात आलेले 12 प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह , मनपा प्रशासन अलर्ट
एकूणच, अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, 83 टक्के लोकांपैकी 81 टक्के लोकांमध्ये कोरोना झाल्यामुळे त्याचा परिणाम डोळ्यांवर झाल्याचं समोर आलं.
| Updated on: Nov 27, 2020 | 1:02 AM
Share

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये दिल्लीहून विमानाने आलेले 12 प्रवासी कोरोना बाधित निघाले आहेत. त्यामुळे नागपूर मनपा प्रशासन अलर्ट झाले आहे. मनपा प्रशासनाने अत्यावश्यक असल्यासच विमान प्रवास करा, असं आवाहन केलं आहे. पहिल्याच दिवशी नागपूर शहरामध्ये दाखल झालेल्या दिल्ली विमानातील 12 प्रवासी कोव्हिड पॉझिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले. यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय (12 passengers from Delhi found Corona infected in Nagpur ).

नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात या सर्व पॉझिटीव्ह रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. त्यांच्या संपर्कातील सर्वांना कोव्हिड मार्गदर्शक सूचनेचे पालन करण्याबाबत मनपा प्रशासनाद्वारे सूचना देण्यात येत आहेत. पुन्हा एकदा कोव्हिडचा वाढता संसर्ग लक्षात घेता विमान प्रवास धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत गरजेच्या वेळीच प्रवास करावा, असं आवाहन मनपा प्रशासनाने केलं आहे.

वाढत्या कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा येथून विमानाने येणाऱ्या प्रवाशांची संपूर्ण तपासणी करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून नागपूर शहरात आलेल्या अहमदाबाद येथील 24 प्रवासी, दिल्ली येथील 38 प्रवासी, दिल्ली येथील 41 प्रवासी अशा एकूण 103 प्रवाशांकडे चाचणीचा रिपोर्ट नव्हता. या सर्व प्रवाशांची विमानतळावरच चाचणी करण्यात आली. यात 12 प्रवासी कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक सण साधेपणानं साजरे झाले. अशातच मोठ्या उत्साहात साजरा होणारा धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा या वर्षी रद्द करण्यात आला आहे. राज्यातील तसेच नागपूरमधील कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेतला असल्याचं दीक्षाभूमी स्मारक समितीने सांगितलं आहे. (Nagpur Dikshabhumi celebrations cancled due to corona)

धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी 14 ऑक्टोबरला बौद्ध अनुयायी नागपुरात मोठ्या संख्येने जमतात. 14 ऑक्टोबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याने या दिवसाला विशेष महत्त्व असते. पण या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने दीक्षाभूमीवरचा सोहळा रद्द केला आहे. भारतभरातून येणाऱ्या अनुयायांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचीव सुधीर फुलझेले यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Nagpur Corona : नागपूरकरांसाठी गूड न्यूज, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

कोरोना नियंत्रणासाठी आयुर्वेदा किट, रोग प्रतिकारकशक्ती वाढत असल्याचा दावा

नागपुरात दीड महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा ग्राफ घसरला

12 passengers from Delhi found Corona infected in Nagpur

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.