नागपुरात दीड महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा ग्राफ घसरला

नागपुरात दीड महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा ग्राफ घसरला आहे (Coroan patient decrease in Nagpur).

नागपुरात दीड महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा ग्राफ घसरला

नागपूर : नागपुरात दीड महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा ग्राफ घसरला आहे (Coroan patient decrease in Nagpur). एका दिवसात 2300 वर गेलेली रुग्णसंख्या गेल्या 24 तासांत 590 वर आली आहे. त्यामुळे नागपूरमधील नागरिकांना दिलासा मिळालेला आहे (Coroan patient decrease in Nagpur).

गेल्या 24 तासात 1650 रुग्ण बरे झाल्याने आरोग्य यंत्रणेलाही दिलासा मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं सत्र मात्र सुरुच आहे. 24 तासात जिल्ह्यात 43 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 74 हजार 821 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 58 हजार 266 रुग्ण झाले बरे झाले आहेत.

नागपुरात लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवकांची नोंदणी पूर्ण

नागपुरातील ऑक्सफोर्डच्या लसीच्या चाचणीसाठी नागपूर मेडीकलमध्ये नोंदणी पूर्ण झाली आहे. नागपूरच्या मेडीकलमध्ये 50 स्वयंसेवकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. दोन दिवसांत मेडीकलमध्ये चाचणीला सुरुवात केली जाणार आहे.

स्वयंसेवकांना लस दिल्यानंतर 28 दिवसांनी त्याच स्वयंसेवकांना पुन्हा लस दिली जाणार आहे. मेडीकल प्रशासन आज (28 ऑक्टोबर) आयसीएमआरच्या तज्ज्ञांशी चर्चा करणार आहे. सहा महिने स्वयंसेवकांच्या आरोग्यवर डॉक्टरांचं लक्ष असणार आहे. मेडीकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रांच्या मार्गदर्शनात चाचणी होणार आहे.

संबंधित बातम्या :

सेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, एपीएमसी मार्केटमध्ये नियमांची पायमल्ली, मार्केटमध्ये भरारी पथक तैनात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *