सेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका

1936 पासून पर्यटकांसाठी उघडे असलेले हे आश्रम कोरोनाच्या संकटात पर्यटकांसाठी गेल्या पाच महिन्यापासून बंद आहे

सेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका

वर्धा : जगात शांततेचं प्रतीक म्हणून महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमची ओळख आहे (Sevagram Ashram Is In Loss). येथे आल्यावर शांतता आणि अहिंसेचा संदेश मिळतो. मात्र, सध्या इथे निरव शांतता दिसते आहे. याला कारणही तसेच आहे. 1936 पासून पर्यटकांसाठी उघडे असलेले हे आश्रम कोरोनाच्या संकटात पर्यटकांसाठी गेल्या पाच महिन्यापासून बंद आहे. या काळात आश्रमाला पर्यटनापासून मिळणारी मिळकत थांबल्याने जवळपास 40 लाखांचा फटका बसल्याची माहिती आहे (Sevagram Ashram Is In Loss).

सेवाग्राम आश्रम मार्च महिन्यापासून बंद करण्यात आले आहे. या काळात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये देशभरातून नागरिक आश्रमाला भेट द्यायला येतात. शाळेच्या सहली या ठिकाणी होतात. महात्मा गांधींचे विचार, हाडा मासाचा माणूस ज्याने कुठलेही शस्त्र न घेता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या महात्म्याची ताकद, सत्य व अहिंसा समजण्यासाठी नागरिक या आश्रमात येतात. खास करुन परदेशातील मंडळी महात्मा गांधींच्या विचारांचा आभ्यास करण्यासाठी या ठिकाणी येतात. मात्र, लॉकडाऊनमुळे हे सर्व बंद झाले आहे.

शेतीतून आश्रमाला मदत होते. यातून मिळणारे अन्न, धान्य, वस्तू यासह काही देणगीदारांकडूनही मदत होते. सेवाग्राम आश्रमाचे आहार केंद्र, यात्री निवास, पुस्तकालय, खादी उत्पादन वस्त्र, गोशाळा अशे मिळकतीचे स्रोत आहे. पण, पर्यटक किंवा दर्शनार्थी न आल्याने मोठ्या प्रमाणात तूट झाली असल्याची माहिती आश्रम प्रतिष्ठानचे सचिव मुकुंद मस्के यांनी दिली (Sevagram Ashram Is In Loss).

दरवर्षी सेवाग्राम आश्रमाला साधारण 4 ते 5 लाख पर्यटक भेटी देतात. यामध्ये विदेशी पर्यटकांचासुद्धा समावेश आहे. गांधीजींना समजून घेणे, त्यांची दिनचर्या जाणून घेण्यासाठी पर्यटक यात्री निवासात मुक्काम करतात. यात्री निवासात जेवणाचीही व्यवस्था आहे. येथे जवळपास 4 ते 5 हजार विदेशी पर्यटक येतात आणि अभ्यासासाठी राहतात. पण, लॉकाडाऊनमुळे ना कोणी आले, ना थांबले. यामुळे आश्रमाचे चालणारे अर्थचक्राचे चाक फिरलेच नाही.

Sevagram Ashram Is In Loss

संबंधित बातम्या :

आधी रिपोर्टमध्ये रुग्णाचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह, नंतर प्लाझ्मा थेरपी करताना एबी पॉझिटिव्ह, खाजगी लॅबचा धक्कादायक प्रताप

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *