‘न्हावा-शेवा’तून 14 कोटींची विदेशी सिगारेट जप्त, सहा महिन्यातील तिसरी घटना, अद्याप कोणालाही अटक नाही

उरणमधील न्हावा-शेवा बंदरातून मुंबई सीमा शुल्क विभागाने शनिवारी दुबईहून देशात तस्करी केली जात असलेला विदेशी सिगरेटचा साठा जप्त केला आहे.

'न्हावा-शेवा'तून 14 कोटींची विदेशी सिगारेट जप्त, सहा महिन्यातील तिसरी घटना, अद्याप कोणालाही अटक नाही
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 7:17 AM

रायगड : उरणमधील न्हावा-शेवा (Nhava Sheva) बंदरातून मुंबई सीमा शुल्क विभागाने शनिवारी दुबईहून देशात तस्करी केली जात असलेला विदेशी सिगरेटचा साठा जप्त केला आहे. या सिगारेटच्या साठ्याची किंमत तब्बल 14 कोटी रुपये आहे. (14 crore foreign cigarettes seized from JNPT, third incident in six months, no arrests yet)

तस्करांनी सीमा शुल्क अधिकाऱ्यांना कळू नये म्हणून सिगारेट ॲल्युमिनियम कचरा आणि वाहनांच्या इंजिनाच्या भागात लपवून ठेवल्या होत्या. तस्करीच्या मार्गे आलेल्या सिगारेटची किंमत 14 कोटी रुपयांच्या घरात आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक केलेली नसली तरी ही सहा महिन्यांमधील तिसरी घटना आहे. त्यामुळे नाव्हा-शेवा येथील जे. एन. पी. टी. बंदर हे पुन्हा एकदा तस्करांचा अड्डा बनत चालल्याचे चित्र समोर आले आहे.

उत्तर प्रदेशमधील माफिया टोळीमार्फत दुबईहून भारतात परदेशी सिगारेटची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. विश्वसनीय खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर न्हावा-शेवा बंदरात दुबईहून आलेल्या जहाजातील संशयित कंटेनर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला. कंटेनरची कसून तपासणी केली असता विदेशी सिगारेट लपवण्याच्या तस्करांच्या युक्तीने अधिकारीही अवाक झाले.

दुबईहून आलेल्या जहाजातील संशयित कंटेनरमधून अॅल्युमिनियम भंगार आणि इंजिनाचे स्पेअर पार्ट आणले होते. या भंगारात आणि स्पेअर पार्टच्या भागावर विदेशी सिगारेट युक्तीने लपविल्या होत्या. सीमाशुल्क अधिनियम 1962 च्या तरतुदीनुसार सिगारेटचा साठा सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागातील सुत्रांनी दिली आहे.

उरण तालुक्यातील न्हावा-शेवा येथील जेएनपीटी बंदरातील मागील सहा महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. तीन-चार महिन्यांपूर्वी दुबईहून आयात करण्यात आलेला 12 कोटी रुपये किंमतीच्या सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला होता. या घटनेमुळे न्हावा शेवा बंदर हे सिगारेट तस्करांचा अड्डा होऊ लागला असल्याचे चित्र समोर आले

संबंधित बातम्या

ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक, साडे पाच हजाराच्या ड्रेस ऐवजी रद्दी, वापरलेल्या साड्या पार्सल

चोरट्यांनी भर रस्त्यात बेदम मारहाण करत लुटलं, पोलिसांनी निळ्या रंगाच्या शर्टावरुन चोरांना पकडलं

मौज-मजेसाठी महागड्या दुचाकींची चोरी, उल्हासनगरातील तिघे ताब्यात

(14 crore foreign cigarettes seized from JNPT, third incident in six months, no arrests yet)

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.