पिंपरीत 20 वर्षीय युवकाची प्रेम प्रकरणातून हत्या

पिंपरीत 20 वर्षीय युवकाची प्रेम प्रकरणातून हत्या

पिंपळे सौदागर भागात रविवारी रात्री20 वर्षीय युवकावर चार ते पाच जणांनी धारदार शास्त्राने वार केले होते (20 Years Old Youth Killed in Pimpri Chinchwad)

अनिश बेंद्रे

|

Jun 09, 2020 | 7:34 AM

पिंपरी चिंचवड : प्रेम प्रकरणातून 20 वर्षीय युवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. चार ते पाच जणांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. (20 Years Old Youth Killed in Pimpri Chinchwad)

पिंपळे सौदागर भागात रविवारी रात्री हा प्रकार घडला. चार ते पाच जणांच्या टोळक्याने 20 वर्षीय विराज जगतापला पुलावर गाठले. त्याच्यावर धारदार हत्याराने वार केले. हल्ल्यात विराज गंभीर जखमी झाला होता.

पिंपरीतील खाजगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरु असतानाच काल (सोमवारी) दुपारी विराजने अखेरचा श्वास घेतला. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा सांगवी पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा : मुंबईत कोरोनाग्रस्ताची हत्या, हत्येच्या पाच दिवसांनी रिपोर्ट पॉझिटिव्ह, आता मृतदेहच रुग्णालयातून गायब

या प्रकरणी सहा जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात हत्येच्या गुन्ह्यासह अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून इतरांचा शोध सुरु आहे.

(20 Years Old Youth Killed in Pimpri Chinchwad)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें