AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Brahmastra | तब्बल 300 कोटींचे बजेट, रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ भारतातील सर्वात महागडा चित्रपट!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांमध्ये गणले जातात. दोघांचेही चाहते त्यांचा आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाची वाट गेल्या अनेक दिवसांपासून बघत आहेत.

Brahmastra | तब्बल 300 कोटींचे बजेट, रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' भारतातील सर्वात महागडा चित्रपट!
| Updated on: Nov 28, 2020 | 6:25 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांमध्ये गणले जातात. दोघांचेही चाहते त्यांचा आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची वाट गेल्या अनेक दिवसांपासून बघत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे शूटिंग गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 2018 पासून सुरू असलेल्या या चित्रपटाचे बजेट तब्बल 300 कोटींच्या घरात गेले आहे.(300 crore, Ranbir-Alia’s ‘Brahmastra’ is the most expensive movie in India) ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले होते. नुकत्याच एका मुलाखतीत ‘स्टार’ आणि ‘डिज्नी इंडिया’ चे अध्यक्ष उदय शंकर यांनी ‘ब्रह्मास्त्र’ हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट असण्याची शक्यता वर्तविली आहे. ‘एचटी लीडरशिप समिट 2020’मध्ये बोलताना शंकर म्हणाले की, “ब्रह्मास्त्र” हा आतापर्यंत बनलेला भारतातील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. पण याबद्दल बोलताना उदय यांनी चित्रपटाचे बजेट जाहीर केले नाही. जेव्हा उदय शंकर यांना, ‘ब्रह्मास्त्र चित्रपटाची एकूण किंमत 300 कोटी आहे का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, त्यापेक्षाही जास्त आहे. असा कोणताही चित्रपट करण्यास वेळ लागतो.  आणि अशा चित्रपटाला चित्रपटगृहात चांगला प्रेक्षक वर्ग मिळू शकतो. या चित्रपटामध्ये खूपसे ग्राफिक्स वापरले आहे. करण जोहर हा चित्रपट ओटीटी रिलीजवर करण्याबाबत उत्सुक नसल्याचे म्हटले जात होते. चित्रपटाचे निर्माते करण जोहर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याला उत्सुक नाहीत. कारण या चित्रपटामध्ये खूप जास्त ग्राफिक्स वापरले गेले आहेत, ज्याचा खरा आनंद चित्रपटगृहातच येईल. चित्रपटाच्या टीमला या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांसमोर प्रदर्शित करावा, अशी इच्छा आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट त्यांच्या अफेअरमुळे सध्या चर्चेत आहेत. दोघेही ब्रह्मास्त्र सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. दोघांचं अफेअर असल्याचं जवळपास निश्चित आहे. पण सध्या या दोघांच्या रिलेशनशीपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. काही वृत्तांनुसार, आलिया आणि रणबीर यांच्या रिलेशनशीपमध्ये सगळं काही ऑल इज वेल नाहीय. आलियाच्या वारंवार फोन, मेसेज करण्याने रणबीर वैतागला असल्याचं बोललं जात आहे. आलियाला रणबीरचा वेळ हवा आहे. पण रणबीरला ही गोष्ट खटकत असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या :

Bharati Singh | ड्रग्जच्या प्रकरणात अडकल्यामुळे भारती सिंहच्या अडचणी वाढ, ‘कपिल शर्मा’मधूनही हकालपट्टी?

(300 crore, Ranbir-Alia’s ‘Brahmastra’ is the most expensive movie in India)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.