AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसाच्या दबावाला कंटाळून 51 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

पोलिसाच्या दबावाला कंटाळून भाईंदर येथे एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रमेश पाठक (51) असं आत्महत्या (Police blackmailing bhayandar suicide) केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसाच्या दबावाला कंटाळून 51 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
| Edited By: | Updated on: Dec 20, 2019 | 8:56 AM
Share

मुंबई : पोलिसाच्या दबावाला कंटाळून भाईंदर येथे एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रमेश पाठक (51) असं आत्महत्या (Police blackmailing bhayandar suicide) केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रमेश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. ज्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि दोन इतर लोकांच्या नावाचा उल्लेख (Police blackmailing bhayandar suicide) केला होता. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास करत आहेत.

मयत रमेश पाठक यांनी आपले घर 2013 मध्ये नयना यांना हेवी डिपॉझीट तीन लाख रुपयामध्ये भाड्याने दिले होते. दोन वर्षापूर्वी रमेश यांनी नयना यांचे डिपॉझीट केलेले तीन लाख रुपये परत दिले. पण नयना यांच्याकडून रमेश यांनी कागद पत्र घेतले नाही. त्यानंतर कालांतराने पैसे देऊनही नयना त्यांचा मुलगा लालू आणि पोलीस कदम यांनी रमेश पाठक यांच्याकडे पैसे मागू लागले. रमेश यांनी नकार दिल्यामुळे सतत त्यांच्यावर दबाव टाकून पोलीस स्टेशनची भीती दाखवली जात होती.

या सततच्या दबावामुळे कंटाळून रमेश पाठक यांनी गळफास राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी पोलीस कर्मचारी, नयना आणि तिच्या मुलाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या आत्महत्येचे कारण उघडकीस झाले. भाईंदर पोलिसांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान, रमेश पाठक यांच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे. तसेच पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.