AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उस्मानाबादमध्ये साहित्य संमेलन, अध्यक्ष दिब्रिटोंच्या प्रकृतीत सुधारणा, तर धमकीनंतरही महानोर उपस्थित राहणार

उस्मानाबाद : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून उस्मानाबादमध्ये सुरुवात झाली (93rd akhil bharatiya marathi sahitya sammelan). आजपासून तीन दिवस म्हणजे 10, 11 आणि 12 जानेवारी या कालावधीत संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाला देशभरातील मराठी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत (93rd akhil bharatiya marathi sahitya sammelan). आज सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीपासून या संमेलनाला […]

उस्मानाबादमध्ये साहित्य संमेलन, अध्यक्ष दिब्रिटोंच्या प्रकृतीत सुधारणा, तर धमकीनंतरही महानोर उपस्थित राहणार
| Edited By: | Updated on: Jan 10, 2020 | 9:59 AM
Share

उस्मानाबाद : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून उस्मानाबादमध्ये सुरुवात झाली (93rd akhil bharatiya marathi sahitya sammelan). आजपासून तीन दिवस म्हणजे 10, 11 आणि 12 जानेवारी या कालावधीत संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाला देशभरातील मराठी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत (93rd akhil bharatiya marathi sahitya sammelan).

आज सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीपासून या संमेलनाला सुरुवात झाली. संध्याकाळी 4 वाजता या संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. त्यामुळे ते उद्घाटनाला उपस्थित राहून अध्यक्षीय भाषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांना संमेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, महानोर यांना उद्घाटनाला उपस्थित न राहण्याचा धमकीचा फोन आला होता. मात्र, “तरीही आपण कार्यक्रमाला उपस्थित राहू”, असे महानोर यांनी सांगितले आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर महानोर आणि दिब्रिटो यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले. ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मात्र पुण्याच्या ब्राह्मण महासंघाने अध्यक्षपद निवडीवरुन विरोध केला. यानंतर महासंघाकडून संमेलनाचे उद्घाटक ना. धों. महानोर यांनाही कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा इशारा देण्यात आला. मात्र, तरीही महानोर उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्यावतीने 93 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. 10, 11 आणि 12 जानेवारी दरम्यान हे संमेलन पार पडणार आहे. या संमेलनात कवीकट्टा आणि परिसंवाद सारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Follow Us
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.