अतिषबाजीतून फटाक्याचा तुकडा छातीत शिरला, रक्तवाहिनीतून यकृतात गेला, सुदैवाने प्राण वाचले

मुंबईः रस्त्यावर सुरु असलेल्या आतिषबाजीचा आनंद (Firecracker) सगळेच घेतात. मात्र याच आतिषबाजीतून उडालेला फटाक्याचा तुकडा एका मुलाच्या छातीवर आला. पण या फटाक्याचा वेग एवढा होता की, तो तुकडा छातीतून रक्तवाहिनीत आणि तिथून यकृतात शिरला. सुदैवाने हा सर्व प्रकार वेळीच डॉक्टरांच्या (Doctors in KEM Hospital) लक्षात आल्याने 20 वर्षीय मुलाचे प्राण वाचले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया […]

अतिषबाजीतून फटाक्याचा तुकडा छातीत शिरला, रक्तवाहिनीतून यकृतात गेला, सुदैवाने प्राण वाचले
प्रातिनिधिक छायाचित्र
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Nov 17, 2021 | 2:35 PM

मुंबईः रस्त्यावर सुरु असलेल्या आतिषबाजीचा आनंद (Firecracker) सगळेच घेतात. मात्र याच आतिषबाजीतून उडालेला फटाक्याचा तुकडा एका मुलाच्या छातीवर आला. पण या फटाक्याचा वेग एवढा होता की, तो तुकडा छातीतून रक्तवाहिनीत आणि तिथून यकृतात शिरला. सुदैवाने हा सर्व प्रकार वेळीच डॉक्टरांच्या (Doctors in KEM Hospital) लक्षात आल्याने 20 वर्षीय मुलाचे प्राण वाचले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया करत हा मुलाचे प्राण वाचवले. डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे या तरुणाला जीवदान मिळाले आहे.

फटाका उडून छातीवर आला

मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेल्या आकाश चौधरी हा 20 वर्षीय मुलगा तीन वर्षांपासून मालाड येथे राहतो. दिवाळीदरम्यान रात्री घरी परतत असताना त्याच्या अंगावर एक फटाका उडाला. त्याचा वेग एवढा जास्त होता की, फटाक्यातील धातूचा तुकडा थेट मुलाच्या छातीतून रक्तवाहिन्यात गेला. रक्तवाहिन्यांतून तो यकृतात घुसला. हा तुकडा आकाशच्यचा शरीरात 4 सेंटीमीटर आतपर्यंत घुसला होता. आकाशच्या भावाने त्याला तातडीने नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे उपचार केल्यानंतर त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी यूट्यूबद्वारे छातीत जमा झालेले पाणी काढले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला केईएम रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

धातूचा तुकडा जीवावर बेतणार होता…

केईएम रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सरे आणि सीटी स्कॅनद्वारे फटाक्याचा तुकडा शरीरा गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर लेप्रोस्कोपीच्या सहाय्याने हा तुकडा बाहेर काढण्यात आला. या प्रकारात धातूचा तुकडा पुढे गेला असता तर, पित्ताशय नळीला फोडले असते. कारण पित्ताशय नलिकेच्या अगदी जवळ हा तुकडा पोहोचला होता. लेप्रोस्कोपीच्या सहाय्याने हा तुकडा काढण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

इतर बातम्या-

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात हस्तक्षेप करा, पडळकरांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

सात दिवसांत 1 हजार रुपयांनी कांद्याच्या दरात घट, सरकारच्या निर्णयामुळेच शेतकऱ्यांचा वांदा

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें