राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार? अब्दुल सत्तार म्हणतात…

अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला मदत मिळावी, या उद्देशाने हा पाहणी दौरा करत असल्याची माहिती सत्तार यांनी 'टीव्ही 9 मराठी'सोबत बोलताना दिली (Abdul Sattar on Wet drought).

राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार? अब्दुल सत्तार म्हणतात...

औरंगाबाद : कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या भागाचा पाहणी दौरा करत आहेत (Abdul Sattar on Wet drought). अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला मदत मिळावी, या उद्देशाने हा पाहणी दौरा करत असल्याची माहिती सत्तार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली. यावेळी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करणार का? या प्रश्चाचं उत्तर अब्दुल सत्तार यांनी दिलं (Abdul Sattar on Wet drought).

“राज्यात सर्वत्र ओल्या दुष्काळाची परिस्थिती नाही. पण काही जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी शेतीच्या बांधावर जाण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यानुसार गेल्या आठवड्याभरापासून विविध भागांची पाहणी करत आहोत”, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

“प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी परिस्थिती आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. 100 मिलीपेक्षा जास्त पाऊस पडला. ज्या भागात 65 मिलीपेक्षा जास्त पाऊस पडला त्याभागात नुकसानीचे पंचनामे करावे, हे राज्य सरकारचे धोरण आहे. अधिकारी पंचनाम्यांची जोपर्यंत माहिती देत नाहीत तोपर्यंत आम्हाला निर्णय घेता येणार नाही”, असं सत्तार यांनी स्पष्ट केलं.

“सध्याच्या परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाल्यामुळे सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी घेऊन आम्ही दौरा करत आहोत. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. हे आसमानी संकट आहे. या संकटात शेतकऱ्याचे डोळे सरकारकडे लागले आहे. सरकारी अधिकारी येऊन आमची शेती बघतील, नुकसानीता पंचनामा करतील, अशी आशा शेतकऱ्याला लागलेली आहे. आज संध्याकाळपर्यंत कन्नड, वैजापूर, गंगापूर या तालुक्यांचा दौरा करु”, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.

संंबंधित बातमी :

चंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI