5

धक्कादायक! कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

धक्कादायक! कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 7:56 AM

भिवंडी : थंडीमध्ये वाढत्या धुकांमुळे अपघाताच्या प्रमाणांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिकहुन मुंबईच्या दिशेने भरधाव जात असलेली कार दुभाजकावरून उडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका लक्झरी बसली धडकली. या भीषण अपघातामध्ये तब्बल 4 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Accident news Car and luxury bus crash kills 4 on the spot in bhiwandi)

मिळालेल्या माहितीनुसार, कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्ता दुभाजकावरून कार उडून विरुद्ध दिशेने गेली. यावेळी नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसला तिची धडक झाली. या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी कोनगावं पोलीस दाखल झाले असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

या भीषण अपघातामुळे रस्त्यावर थोडा वेळा वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. खरंतर, थंडीचे दिवस असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूकं पाहायला मिळतं. त्यामुळे वाहनं हळू चालवा अशा सूचना वारंवार देण्यात येतात. पण तरीदेखील गाडीच्या वेगावर काही नियंत्रण ठेवलं जात नाही आणि त्यामुळे अशा अपघातांना समोर जावं लागतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून 4 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या भिवंडी आयजीएम हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आलं आहे. तर जखमींवरही उपचार सुरू आहे. दरम्यान, पोलिसही प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Accident news Car and luxury bus crash kills 4 on the spot in bhiwandi)

संबंधित बातम्या – 

छत्तीसगडच्या माजी मंत्र्याच्या सून आणि नातीची हत्या, बंद घरात मृतदेह सापडले

‘तुला अक्कल नाही का?’ म्हणताच पोलिसांवर जीवघेणा हल्ला; पुणे हादरले

आधी हत्या, नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; माजी नगरेवकाच्या आईच्या खुनामुळे परिसरात खळबळ

(Accident news Car and luxury bus crash kills 4 on the spot in bhiwandi)

Non Stop LIVE Update
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
शाहांच्या दौऱ्याला अजितदादा का होते गैरहजेर? खडसेंनी सांगितले कारण...
शाहांच्या दौऱ्याला अजितदादा का होते गैरहजेर? खडसेंनी सांगितले कारण...
'माझं अर्थखातं टिकेल की नाही माहित नाही', अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
'माझं अर्थखातं टिकेल की नाही माहित नाही', अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
राज्यात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा काय?
राज्यात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा काय?