छत्तीसगडच्या माजी मंत्र्याच्या सून आणि नातीची हत्या, बंद घरात मृतदेह सापडले

छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांची सून आणि 9 वर्षाची नात यांची निर्घृण हत्या झालीय. दोघींचेही मृतदेह शनिवारी (30 जानेवारी) घरात सापडले.

छत्तीसगडच्या माजी मंत्र्याच्या सून आणि नातीची हत्या, बंद घरात मृतदेह सापडले
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 7:41 PM

बिलासपूर : छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांची सून आणि 9 वर्षाची नात यांची निर्घृण हत्या झालीय. दोघींचेही मृतदेह शनिवारी (30 जानेवारी) घरात सापडले. आरोपींनी हत्येनंतर मृतदेह घरातील पलंगामध्ये लपवून ठेवले. हे कुटुंब छत्तीसगडमधील खम्हारडीह भागातील सतनाम चौकात राहतात. खम्हारडीह पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून चौकशी सुरु आहे (Murder of ex ministers daughter in law and granddaughter corpses found in a closed house in Chhattisgarh).

आतापर्यंत या हत्येमागील कारणाचा उलगडा झालेला नाही. महिलेचं नाव नेहा आणि त्यांच्या 9 वर्षीय मुलीचं नाव अनन्या आहे. नेहाच्या घरच्यांनी तिच्या पतीवर कट करुन हत्येचा आरोप केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, आई आणि मुलगी यांची हत्या शनिवारी (30 जानेवारी) सायंकाळी 7 ते 8 वाजल्याच्या दरम्यान झाल्याचा संशय आहे. नेहाच्या माहेरच्यांनी पोलिसांना तिचा फोन लागत नसल्याचंही सांगितलं. फोन न लागल्याने नेहाच्या घरापासून जवळच राहणारी तिची बहिण मेघा तिची विचारपूस करायला आली. मात्र, दरवाजा बंद होता आणि नेहाची स्कुटी, चप्पल तेथेच होते. यानंतर मेघाने तातडीने तिच्या भावाला फोन केला. भाऊ आकाशने पोलिसांना कळवलं. दुसरीकडे बहिण मेघाने नेहाच्या घराचा दरवाजा तोडला.

घर उघडल्यानंतर घरात सर्व अंधार होता. बेडरुममध्ये नेहाचा दिर डॉ आनंद राय आणि त्याचा एक सहकारी लपलेले आढळले. मेघाने त्यांना पकडलं. तोपर्यंत घटनास्थळावर पोलीसह पोहचले होते. घरात एका खोलीत बेडवरील गादी आणि इतर सामान अस्ताव्यस्त विखुरलेलं होतं. नेहाचे कुटंबीय वेद राम मनहरे यांनी आरोप केलाय की ” नेहा आणि तिच्या पतीमध्ये काही दिवसांपासून भांडण सुरु होतं. त्यामुळे तिच्या नवऱ्यानेच हा हत्येचा कट रचला आहे. त्याला नेहाचा दीर डॉ. आनंदने देखील मदत केली.” 2010 मध्ये दोघांनीही एकमेकांच्या पसंतीतूनच लग्न केलं होतं. सध्या पोलीस तपास करत आहेत.

दोन्ही खून बुटांच्या लेसचा उपयोग करुन करण्यात आले आहेत, अशी माहिती शवविच्छेदनात समोर आलीय. आई आणि मुलीचा गळा आवळण्यात आलेल्या दोन्ही लेस एकाच बुटाच्या आहेत. महिलेच्या डाव्या हातावर काही जखमा दिसून आल्यात. त्यावरुन महिलेने मृत्यूपूर्वी हत्याऱ्यांचा विरोध केला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. असं असलं तरी पोलिसांना घटनास्थळावर एकही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे पोलीस सध्या लेस वापरलेल्या बुटाचा शोध घेत आहेत.

महिलेची हत्या झाली तेव्हा तिची मुलगी तेथे उपस्थित असावी त्यामुळेच आपला गुन्हा लपवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठीच या मुलीचीही हत्या झाली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हेही वाचा :

‘तुला अक्कल नाही का?’ म्हणताच पोलिसांवर जीवघेणा हल्ला; पुणे हादरले

आधी हत्या, नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; माजी नगरेवकाच्या आईच्या खुनामुळे परिसरात खळबळ

Crime | संपत्तीचा हव्यास, घराचा ताबा मिळावा म्हणून आईचे शव 10 वर्ष फ्रीजमध्येच लपवले!

व्हिडीओ पाहा :

Murder of ex ministers daughter in law and granddaughter corpses found in a closed house in Chhattisgarh

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.