Abhishek Bachchan | ‘अभिषेक ‘बच्चन’ नसता तर…’, ट्रोल करणाऱ्या चाहत्याला जुनियर बच्चनचे प्रत्युत्तर!

नुकत्याच एका ट्रोल करणाऱ्या चाहत्याला अभिषेकने त्याच्याच भाषेत उत्तर दिले आहे. अभिषेकच्या उत्तराने या सोशल मीडिया वापरकर्त्याची बोलतीच बंद झाली आहे.

Abhishek Bachchan | ‘अभिषेक ‘बच्चन’ नसता तर...’, ट्रोल करणाऱ्या चाहत्याला जुनियर बच्चनचे प्रत्युत्तर!
Harshada Bhirvandekar

|

Nov 10, 2020 | 3:11 PM

मुंबई : जुनियर बच्चन अर्थात बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतो. नुकत्याच एका ट्रोल (Troller) करणाऱ्या चाहत्याला अभिषेकने त्याच्याच भाषेत उत्तर दिले आहे. अभिषेकच्या उत्तराने या सोशल मीडिया वापरकर्त्याची बोलतीच बंद झाली आहे. या वापरकर्त्याने एक फोटो शेअर करत अभिषेक बच्चनला टोमणा मारला होता. यावर जोरदार प्रत्युत्तर देत, अभिषेकने पुन्हा एकदा सगळ्या ट्रोलर्सला टोला हाणला आहे (Actor Abhishek Bachchan Epic Reply to troller).

एका ट्विटर वापरकर्त्याने अभिषेक बच्चनला (Abhishek Bachchan) एएनआयच्या फोटोद्वारे ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. एएनआयने पोस्ट केलेल्या या फोटोतील शेतकऱ्याचा चेहरा काहीसा अभिषेक बच्चनशी साधर्म्य असणारा आहे. एएनआयचा हाच फोटो शेअर करताना वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जर अभिषेक ‘बच्चन’ नसता तर…’. हा फोटो शेअर करत त्याने अभिषेक बच्चनला ट्रोल (Troller) करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नेहमीप्रमाणेच अभिषेकने त्याची ही थट्टा गमतीने घेत, सदर वापरकर्त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले. ‘हाहाहा…मजेदार… तरीही मी तुझ्यापेक्षा चांगला दिसतो!’, असे म्हणत जुनियर बच्चनने या वापरकर्त्यालाच टोला हाणला.

(Actor Abhishek Bachchan Epic Rply to troller)

याआधीही अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न

बॉलिवूडमध्ये ड्रग्ज कनेक्शन प्रकरण गाजत असतानाच एका वापरकर्त्याने अभिषेकला ‘तुझ्याकडे हॅश आहे का?’, असा प्रश्न सोशल मीडियाद्वारे विचारला होता. यावर अभिषेकने त्याला सणसणीत उत्तर दिले होते. ‘मला माफ करा, माझ्याकडे असले काही नाही. मात्र, मी तुमची भेट मुंबई पोलिसांशी करून देऊ शकतो’, असे उत्तर त्याने या व्यक्तीला दिले होते.(Actor Abhishek Bachchan Epic Reply to troller)

‘मी वडिलांसाठी फिल्म बनवली, त्यांनी माझ्यासाठी नाही!’

केवळ महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा म्हणून ट्रोल करणाऱ्यांना अभिषेक चांगलेच उत्तर देत असतो. नेपोटिझमप्रकरणातही अभिषेकवर वडिलांची कृपा म्हणत टीका करण्यात आली होती. यावर अभिषेक बच्चनने सणसणीत उत्तर देत, सगळ्यांची बोलती बंद केली होती.

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान अभिषेकला नेपोटिझमबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, ‘माझ्या वडिलांनी कधीच माझी शिफारस केली नाही. त्यांनी माझ्यासाठी कुठलाच चित्रपट तयार केला नाही. याउलट मीच त्यांच्यासाठी ‘पा’ नावाचा चित्रपट तयार केला होता’, असे म्हटले. एका मुलाखती दरम्यान त्याला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. (Actor Abhishek Bachchan Epic Reply to troller)

‘माझ्या वडिलांनी म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांनी कधीच माझ्यासाठी कुठलाही चित्रपट तयार केला नाही. या उलट मीच त्यांच्यासाठी ‘पा’ नावाचा चित्रपट तयार केला होता. त्यांनी कधीच माझी शिफारसदेखील केली नाही. मात्र, नेहमी ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. चित्रपट हा एक व्यवसाय आहे आणि लोकांनी तो समजला पाहिजे’, असे अभिषेक म्हणाला.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रीद’ या वेब सीरीजमध्ये अभिषेक बच्चन झळकला होता. यातील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘लुडो’ या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

(Actor Abhishek Bachchan Epic Reply to troller)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें