Actor Chiranjeevi Sarja Death | अभिनेता चिरंजीवी सर्जाच्या निधनाने सिनेसृष्टी शोकसागरात, गरोदर पत्नीवर दु:खाचा डोंगर

दहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मेघना राज आणि चिरंजीवी सर्जाचे 2 मे 2018 रोजी लग्न झाले होते. (Actor Chiranjeevi Sarja Dies)

Actor Chiranjeevi Sarja Death | अभिनेता चिरंजीवी सर्जाच्या निधनाने सिनेसृष्टी शोकसागरात, गरोदर पत्नीवर दु:खाचा डोंगर
| Updated on: Jun 08, 2020 | 5:47 PM

बंगळुरु : कन्नड चित्रपट अभिनेता चिरंजीवी सर्जा याच्या अकस्मात निधनानंतर संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. रविवार 7 जून रोजी वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी चिरंजीवी सर्जाची प्राणज्योत मालवली. दहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न झालेल्या सर्जाची पत्नी आणि अभिनेत्री मेघना राज गरोदर आहे. त्यामुळे आपल्या बाळाची आतुरतेने वाट पाहणारा सर्जा अक्षरशः भरल्या ताटावरुन उठून गेल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. (Actor Chiranjeevi Sarja Dies Fans Cry as Wife Actress Meghana Raj is Pregnant)

हृदयविकाराच्या झटक्याने चिरंजीवी सर्जाचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्याला श्वास घेण्यातही त्रास होत होता. सर्जाच्या मृत्यूने त्यांचे कुटुंब, विशेषत: पत्नी उद्ध्वस्त झाली आहे.

दहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मेघना राज आणि चिरंजीवी सर्जाचे 2 मे 2018 रोजी लग्न झाले होते. आधी दोघांची मैत्री झाली. काळानुसार ती फुलत गेली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अखेर त्यांनी दोन वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. गेल्याच महिन्यात त्यांनी लग्नाचा दुसरा वाढदिवस आनंदात साजरा केला होता.

हेही वाचा : 2020 वर्ष निराशाजनक; घाबरु नका, संकटाचा सामना करा, अक्षय कुमारचं आवाहन

चिरंजीवी सर्जाने 2009 मध्ये ‘वायुपुत्र’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्द सुरु केली. त्याने दहा वर्षांच्या प्रवासात 20 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. तो दक्षिण चित्रपट अभिनेता अर्जुन सर्जा यांचा पुतण्या, तर अ‍ॅक्शन अभिनेता राजकुमार ध्रुव सर्जाचा भाऊ.

आपल्या संसारवेलीवर फुलणाऱ्या नव्या कळीची आतुरता दोघांना होती. अलीकडेच मेघनाने चिरंजीवीसोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चिरंजीवीने आपल्या पहिल्या बाळाचा चेहरा पाहण्याआधीच जगाचा निरोप घेतल्याने चाहते हळहळले आहेत.