2020 वर्ष निराशाजनक; घाबरु नका, संकटाचा सामना करा, अक्षय कुमारचे आवाहन

"मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका, घाबरु नका, संकटाचा सामना करा," असे आवाहन अभिनेता अक्षय कुमारने केले (Akshay Kumar on Nisarga Cyclone) आहे.

2020 वर्ष निराशाजनक; घाबरु नका, संकटाचा सामना करा, अक्षय कुमारचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रावर घोंगावणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकणाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले (Akshay Kumar onNisarga Cyclone) आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वादळ अलिबागला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चक्रीवादळाचा प्रभाव आज (बुधवार 3 जून) आणि उद्या महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे. “मुंबईकरांनो घाबरु नका, संकटाचा सामना करा,” असे आवाहन अभिनेता अक्षय कुमारने केले आहे. तसेच मुंबईकरांनी पालिका प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावं अशी विनंतीही अक्षय कुमारने केली आहे.

“मुंबईत सध्या पाऊस होत आहे. दरवर्षी सर्वजण याची प्रतिक्षा करत असतो. मात्र 2020 हे एक वेगळं वर्ष आहे. सुरुवातीपासून काही ना काही त्रास देत आहे. पावसाचाही आनंद नीट घेऊ देत नाही. रिमझिम पावसासोबतच चक्रीवादळही येत आहे. जर देवाची आपल्यावर कृपा झाली तर हे वादळ येणारही नाही किंवा या वादळाचा वेग असेल. पण जर हे वादळ मुंबईत आले तरी आपण मुंबईकर घाबरणारे नाही. आपल्या सुरक्षेची खबरदारी घेत आहोत.”

“मुंबई पालिका प्रशासनाने काही महत्त्वाची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याची संपूर्ण यादी पालिकेने तयार केली आहे. आपल्याला फक्त त्याचे पालन करायचे आहे आणि आणखी एका संकटाचा सामना करु,” असेही अक्षय कुमार म्हणाला.

“सर्वात आधी घराबाहेर पडू नका, समुद्र किनाऱ्यावर जाऊ नका, जर बाहेर असाल तर सुरक्षित ठिकाणी राहा. झाडांखाली उभे राहू नका. गरज नसेल तर वीज, गॅस बंद ठेवा. घराबाहेरील झाडांच्या कुंड्या बांधून घ्या किंवा घरात घ्या. मेणबत्ती, टॉर्च आणि खाण्यापिण्याच्या वस्तू जवळ ठेवा,” अशा अनेक सूचना अक्षय कुमारने केल्या आहेत.

“जर कोणतीही अडचण आली तर 1916 वर फोन करुन पालिकेची मदत घ्या. अफवांवर विश्वास ठेवा. तसेच घाबरुन जाऊ नका. संकटाचा सामना करा,” असेही अक्षय कुमारने व्हिडीओत म्हटलं आहे.

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्रावर घोंगावणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागपासून अवघ्या 130 किमी, तर मुंबईपासून 175 किमी दूर अंतरावर होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वादळ अलिबागला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरीत वाऱ्याने चांगलाच वेग पकडला असून वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किमीवर जाण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा प्रभाव आज (बुधवार 3 जून) आणि उद्या महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे. यासोबतच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला (Akshay Kumar on Nisarga Cyclone) आहे.

संबंधित बातम्या :

रत्नागिरीत वाऱ्याने वेग पकडला, ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागपासून 130 किमी अंतरावर

मुंबई-पुण्यासह, कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस, कुठे कुठे मुसळधार?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *