‘उरी’ फेम विकी कौशलचा भीषण अपघात, चेहऱ्यावर 13 टाके

मुंबई : ‘उरी’ सिनेमात ‘हाऊज द जोश’ डायलॉगने सिनेरसिकांच्या शरीरिवर काटा उभा करणाऱ्या अभिनेता विकी कौशलचा भीषण अपघात झाला आहे. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान गुजरातमध्ये विकी कौशलचा अपघात झाला. यात विकी कौशलला गंभीर दुखापत झाली आहे. सिनेदिग्दर्शक भानू प्रताप सिंग यांच्या हॉरर सिनेमासाठी अभिनेता विकी कौशल गुजरातमध्ये शूटिंग करत होता. त्यावेळी अॅक्शन सीनदरम्यान विकी कौशलचा अपघात […]

'उरी' फेम विकी कौशलचा भीषण अपघात, चेहऱ्यावर 13 टाके
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : ‘उरी’ सिनेमात ‘हाऊज द जोश’ डायलॉगने सिनेरसिकांच्या शरीरिवर काटा उभा करणाऱ्या अभिनेता विकी कौशलचा भीषण अपघात झाला आहे. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान गुजरातमध्ये विकी कौशलचा अपघात झाला. यात विकी कौशलला गंभीर दुखापत झाली आहे.

सिनेदिग्दर्शक भानू प्रताप सिंग यांच्या हॉरर सिनेमासाठी अभिनेता विकी कौशल गुजरातमध्ये शूटिंग करत होता. त्यावेळी अॅक्शन सीनदरम्यान विकी कौशलचा अपघात झाला. या अपघातामुळे विकी कौशलच्या गालाच्या हाडाला दुखापत झाली. विकी कौशलच्या चेहऱ्यावर 13 टाके पडले आहेत. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी यासंदर्भात माहिती दिली.

भानू प्रताप सिंग दिग्दर्शन करत असलेल्या हॉरर सिनेमात धावत जाऊन दरवाजा उघडायचा, असा सीन विकीला करायचा होता. त्यावेळी दरवाजा विकीच्या चेहऱ्यावर पडला आणि त्यात त्याला दुखापत झाली. या अपघातानंतर विकीला तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

संजू, मनमर्झिया, उरी यांसारख्या सिनेमांमध्ये विकी कौशलने कमी कालावधीत सिनेरसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्याच्या आगामी सिनेमाची सुद्धा मोठ्या उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे. आगामी सिनेमासाठी गेल्या पाच दिवसांपासून विकी कौशल गुजरातमध्ये शूटिंग करत आहे.

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....