BellBottom Teaser | बहुप्रतीक्षित ‘बेलबॉटम’चा टीझर प्रदर्शित, अक्षय कुमार पुन्हा ‘खिलाडी’ अंदाजात!

सोशल मिडियाच्या माध्यमातून अक्षय कुमारने (Akshay kumar) त्याच्या ‘बेलबॉटम’ (BellBottom) चित्रपटाचा टीझर (Teaser) प्रदर्शित केला आहे.

BellBottom Teaser | बहुप्रतीक्षित ‘बेलबॉटम’चा टीझर प्रदर्शित, अक्षय कुमार पुन्हा ‘खिलाडी’ अंदाजात!

मुंबई : हिंदी चित्रपट दुनियेत सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारने (Akshay kumar) देशभक्तीपर चित्रपटांतून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोरोना काळातही अक्षय कुमार वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त होता. याच काळात त्याने आपल्या आगामी चित्रपट ‘बेलबॉटम’चे (BellBottom) चित्रीकरणदेखील पूर्ण केले. आज (5 ऑक्टोबर) अक्षय कुमारने या चित्रपटाचा टीझर (Teaser) प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे (Akshay Kumar New Film BellBottom Teaser released).

सोशल मिडियाच्या माध्यमातून अक्षय कुमारने (Akshay kumar) त्याच्या ‘बेलबॉटम’ (BellBottom) चित्रपटाचा टीझर (Teaser) प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये केवळ अक्षय कुमारचा लूक रिव्हील करण्यात आला आहे. टीझरच्या सुरुवातीलाच एका लो-अँगल कॅमेरा शॉटमध्ये अक्षय कुमारच्या ‘बेलबॉटम’वर फोकस करण्यात आला आहे. ७०च्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या या ‘बेलबॉटम’(BellBottom) पँटवरूनच या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे. ‘बेलबॉटम’ची रुंदी जितकी मोठी तितकीच ती फॅशनेबल, असे मानले जायचे.

अपहरण नाट्याभोवती फिरणार चित्रपटाची कथा

‘बेलबॉटम’ या चित्रपटात विमान अपहरणात अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचा थरार दाखवण्यात येणार असल्याचे कळते आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी टीझरमध्ये (Teaser) याची कोणतीही झलक लीक केलेली नाही. टीझर सुरू होताच थोड्या वेळाने, सूट बूट घातलेल्या अक्षय कुमारची (Akshay Kumar) एंट्री होते. त्यानंतर अचानक इंडियन एअरलाइन्सच्या विमानासमोर कामगाराचा गणवेश घातलेला अक्षय दिसतो. तर, पुढच्या फ्रेममध्ये तो एका टँकरवर लटकताना दिसतो आहे. या टीझरमध्ये एकाही संवाद नाही. मात्र, पार्श्वसंगीताद्वारे एक वेगळा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परंतु टीझरचे व्हिज्युअल जितके प्रभावी वाटतात, तितके पार्श्वसंगीत बनावट वाटते आहे. (Akshay Kumar New Film BellBottom Teaser released)

कोरोना लॉकडाऊन दरम्यान पूर्ण केले चित्रीकरण

‘बेलबॉटम’ चित्रपटाच्या संपूर्ण टीझरमध्ये वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी यांपैकी एकही अभिनेत्री झळकलेली नाही. या तिन्ही अभिनेत्रींनी कोरोना संक्रमण काळात अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) आधी ग्लासगो आणि त्यानंतर लंडनमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. या तिन्ही अभिनेत्री चित्रपटाच्या टीझरमध्येही दिसतील अशी त्यांची चाहत्यांना आशा होती. मात्र, आता प्रेक्षक या अभिनेत्रींसह नव्या टीझरची वाट पाहत आहेत.

(Akshay Kumar New Film BellBottom Teaser released)

Published On - 1:55 pm, Mon, 5 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI