महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

| Updated on: Sep 24, 2019 | 8:11 PM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला (Amitabh Bachchan Dadasaheb Falke Award). केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Praksh Javadekar) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याची घोषणा केली.

महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला (Amitabh Bachchan Dadasaheb Falke Award). केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Praksh Javadekar) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याची घोषणा केली.

अमिताभ हे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित अभिनेते आहेत. गेल्या चार दशकांपासून त्यांनी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांच्या सिनेमांमुळे त्यांना सिनेसृष्टीत ‘अँग्री यंग मॅन’ ही उपाधी देण्यात आली आहे. तसेच त्यांना ‘महानायक’ म्हणूनही संबोधलं जातं. अनेकजण त्यांना प्रेमाने ‘बिग बी’ देखील म्हणतात.

सर्वोत्तम अभिनेता म्हणून त्यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्याशिवाय त्यांना 14 वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. सिनेमांसोबतच अमिताभ बच्चन यांनी गायक, निर्माता आणि टीव्ही होस्ट म्हणूनही काम केलं आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित केलं आहे.

“महान अभिनेता अमिताभ बच्चन ज्यांनी गेल्या दोन पिढ्यांचं मनोरंजन केलं, त्यांना प्रेरित केलं. त्या अमिताभ बच्चन यांची एकमताने ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संपूर्ण देश आणि आंतरराष्ट्रीय समुदाय आनंदी आहे. माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा”, असं ट्वीट प्रकाश जावडेकर यांनी केलं.

दादासाहेब फाळके पुरस्कार

दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Falke Award) हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत आणि तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. 1969 मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो. दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.

संबंधित बातम्या :

मेट्रोसाठी आरे जंगलतोडीला बिग बींचा अप्रत्यक्ष पाठिंबा, अमिताभ बच्चन दोन्ही ठाकरेंविरोधात?

KBC 11 | जेव्हा अमिताभ बच्चन वयाने लहान स्पर्धकाच्या पाया पडतात…

‘हे’ बिग बी अमिताभ बच्चन आहेत!

बिग बी अमिताभ बच्चन तब्बल 25 वर्षांनी मराठी सिनेमात झळकणार!