मेट्रोसाठी आरे जंगलतोडीला बिग बींचा अप्रत्यक्ष पाठिंबा, अमिताभ बच्चन दोन्ही ठाकरेंविरोधात?

सध्या मुंबई मेट्रोसाठी (Mumbai Metro) होणाऱ्या आरेच्या जंगलतोडीला (Arey Forest) विरोध होत आहे. अगदी मनसे (MNS), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीसह (NCP) शिवसेनेने (Shivsena) देखील आरेच्या जंगलतोडीला विरोध केला आहे.

मेट्रोसाठी आरे जंगलतोडीला बिग बींचा अप्रत्यक्ष पाठिंबा, अमिताभ बच्चन दोन्ही ठाकरेंविरोधात?

मुंबई : सध्या मुंबई मेट्रोसाठी (Mumbai Metro) होणाऱ्या आरेच्या जंगलतोडीला (Arey Forest) विरोध होत आहे. अगदी मनसे (MNS), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीसह (NCP) शिवसेनेने (Shivsena) देखील आरेच्या जंगलतोडीला विरोध केला आहे. मात्र, दुसरीकडे बिग बी अमिताभ बच्चन यांनी मात्र, मेट्रो आवश्यक असल्याचे म्हणत अप्रत्यक्षपणे आरेतील झाडं तोडण्याचं समर्थन केलं आहे. त्यामुळे मुंबईत मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जंगलतोडीच्या मुद्द्यावर बिग बी दोन्ही ठाकरेंविरोधात असल्याचं दिसत आहे.


अमिताभ बच्चन आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “माझ्या एका मित्राला तात्काळ दवाखान्यात जायचं होतं. त्याने कारऐवजी मेट्रोनं जाणं पसंद केलं. तो उपचार घेऊन घरी परतला तेव्हा तो खूप प्रभावित झाला होता. त्यानं मेट्रो खूप जलद, सोयीस्कर आणि उपयुक्त असल्याचं म्हटलं.”

बच्चन आपल्या ट्विटमध्ये मेट्रोची उपयुक्तता सांगून तेवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी मेट्रोचा, प्रदुषणाचा आणि झाडांचाही संबंध जोडला. ते म्हणाले, “प्रदूषणावर उपाय म्हणजे अधिक झाडं लावा. मी आमच्या घराच्या बागेत झाडं लावली आहेत, तुम्ही लावलीत का?” यातून बच्चन यांनी अप्रत्यक्षरित्या मेट्रोच्या कामासाठी आरेतील जंगलतोडीलाच पाठींबा दिल्याचं बोललं जात आहे.

विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या या भूमिकेनंतर मुंबई मेट्रो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चन यांच ट्विट रिट्विट करत कौतुक केलं आहे. त्यामुळे आरेच्या जंगलतोडीवरुन वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आधीच मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जंगलतोडीला विरोध केला आहे. निसर्गानं पदरात टाकलेलं हरितदान उध्वस्त करणारा विकास हवा की रचनात्मक दूरदृष्टीने घडवलेला शाश्वत विकास? असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे.


आदित्य ठाकरेंनी देखील पत्रकार परिषद घेऊन आरेतील जैवविविधतेचा लेखाजोखा मांडला. तसेच मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जंगलतोडीला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं.

नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकेर यांनी देखील आरे आणि मुंबई मेट्रोवर बोलताना नाणारचं जे झालं तेच आरेतील मुंबई मेट्रोचं होईल, असं सुचक वक्तव्य केलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *