ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, ज्यांना राजकारण करायचंय त्यांना करु द्या : अनिल परब

ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे, असं सांगत ज्यांना राजकारण करायचंय त्यांना करु द्या, असा निशाणा शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपचं नाव घेता साधला.

ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, ज्यांना राजकारण करायचंय त्यांना करु द्या : अनिल परब

मुंबई : “मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकार सकारात्मक पावले उचलत आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यांना कुणाला राजकारण करायचं असेल त्यांना ते करु द्या, समाजाच्या महत्त्वाच्या प्रश्नावरुन राजकारण करुन काही साध्य होणार नाही. शेवटी मराठा समाजाला न्याय मिळणे महत्त्वाचे आहे”, असं शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. (Anil parab on Maratha Reservation)

“मराठा आंदोलकांना मी स्वत: जाऊन भेटलो आहे. त्यांचं निवेदन स्वीकारुन ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील पाठवलं आहे. निवेदनात केलेल्या मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहे. सरकार नक्कीच यासंदर्भात सकारात्मक विचार करेल, ज्यांना कुणाला राजकारण करायचे असेल त्यांनी ते करावं. सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत प्रमाणिक आहे”, असं अनिल परब म्हणाले.

मराठा आंदोलकांनी शनिवारी मातोश्रीवर मशाल मार्च काढला. यानंतर मंत्री अनिल परब यांनी मराठा आंदोलकांची भेट घेऊन त्यांना आश्वस्त केल्यानंतर मराठा क्रांती मशाल मार्च स्थगित करण्यात आला. अनिल परब आणि मराठा आंदोलकांमध्ये तासभर चर्चा पार पाडली. यानंतर मुख्यमंत्री दोन ते तीन दिवसांत मराठा आंदोलकांशी चर्चा करतील, असं आश्वासन अनिल परब यांनी दिल्यानंतर मराठा आंदोलकांनी मशाल मार्च स्थगित केला.

राज्यपाल लवकरच विधानपरिषदेच्या 12 आमदारांची नावे जाहीर करतील

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आपापल्या पक्षातील उमेदवारांची नावे राज्यपाल कोट्यातून नियुक्तीसाठी दिली आहे. ही नावे राज्यपाल जाहीर करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात दोन दिवसांपासून होत आहे. यावर बोलताना अनिल परब म्हणाले, “आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन राज्यपालांना नावे दिलेली आहेत आणि राज्यपाल ती नावे लवकरात लवकर जाहीर करतील असं वाटतं”.

(Anil parab on Maratha Reservation)

हे ही वाचा

मराठा समाजाचा मशाल मोर्चा, 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार

 मोठी बातमी: मराठा आरक्षणावरुन आंदोलक आक्रमक; 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार मशाल मोर्चा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI