आता सहन होत नाही, मी बोलणारच, कंगनाची वागणूक तिच्या घरच्यांनाही दिसत नाही? : अनुराग कश्यप

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने ट्विटरवर अभिनेत्री कंगना रनौतवर सडकून टीका केली (Anurag kashyap slams Kangana Ranaut).

आता सहन होत नाही, मी बोलणारच, कंगनाची वागणूक तिच्या घरच्यांनाही दिसत नाही? : अनुराग कश्यप

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने ट्विटरवर अभिनेत्री कंगना रनौतवर सडकून टीका केली (Anurag kashyap slams Kangana Ranaut). कंगनाचा एका मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत त्याने निशाणा साधला. “कंगनाची सध्याची वागणूक तिच्या घरच्यांना किंवा मित्रांना दिसत नसेल तर तिचं या जगात खरच कुणीच नाही. तिच्या जवळचे तिच्या वागणुकीचा आरसा तिला दाखवत नसतील तर तिचंच नुकसान करत आहेत”, असं अनुराग कश्यप म्हणाला (Anurag kashyap slams Kangana Ranaut).

“मी कंगना रनौतची एक मुलाखत बघितली. कंगना एकेकाळी माझी खूप चांगली मैत्रीण होती. ती माझ्या प्रत्येक चित्रपटाचं कौतुक करुन मला आणखी चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यायची. मात्र, आताची ही कंगना कोण आहे? या कंगनाला मी ओळखत नाही. तिची ही मुलाखत ‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरची आहे”, अशी टीका अनुराग कश्यपने केली.

“यश माणसाला मोहित करतं, भुरळ घालतं, मग तो इन्सायडर असो किंवा आऊटसायडर, ‘माझ्याकडून शिखा, माझ्यासारखं बना’, हे शब्द मी कंगनाच्या तोंडी 2015 अगोदर कधी ऐकले नव्हते. मात्र, आता ती ‘जे माझ्यासोबत नाही ते सर्व स्वार्थी आहेत’, असं म्हणते, म्हणजे आता गोष्ट इथपर्यंत येऊन ठेपली आहे”, असा टोला अनुराग कश्यपने लगावला.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“कंगना दिग्दर्शकांना शिविगाळ करते. एडिटरजवळ बसून आपल्या सहकलाकारांच्या चित्रपटातील भूमिका कापते. तिच्या या वागणुकीमुळे एकेकाळी तिचं कौतुक करणारे दिग्दर्शकही आज तिच्यापासून लांब पळतात. दुसऱ्यांना दडपून टाकण्याची किंवा दबाव टाकण्याची ताकद आपण कमावली, असं कंगनाला वाटत असेल. याशिवाय कंगनाचे जवळचे तिच्या वागणुकीचा आरसा तिला न दाखवून आणि डोक्यावर चढवून तिचंच नुकसान करत आहेत”, असं अनुराग कश्यप म्हणाला.

“मला आणखी काहीच बोलायचं नाही. कंगना किती वायफळ बोलत आहे. मी कंगनाला मानतो. पण आता जी कंगना आहे ती मला सहन होत नाही. बाकी कुणीही नाही बोललं तरी मी बोलणार. आता खूप झालं. कंगणाची ही वागणूक तिच्या घरच्यांना किंवा मित्रांनाही दिसत नसेल तर तिचं या जगात खरंच कुणीच नाही. लोक तुमचा फक्त वापर करत आहेत. शेवटी तुझी मर्जी, मला जितक्या शिव्या द्यायच्या आहेत तितक्या दे”, असं अनुराग कश्यप ट्विटरवर म्हणाला.

दरम्यान, ट्विटरवर एका युजरला प्रतिक्रिया देताना अनुरागने बॉलिवूडच्या चित्रपट निर्मात्या कंपन्यांनादेखील टोला लगावला. “माझा उदरनिर्वाह बॉलिवूडवर चालत नाही. माझ्या चित्रपटाच्या नर्मितीसाठी ‘धर्मा’, ‘एक्सेल’ किंवा ‘यशराज फिल्मस’चे स्टुडिओ येत नाहीत. त्यासाठी नवी कंपनी तयार करावी लागते. मी स्वत: नवी कंपनी तयार करतो”, असं अनुराग कश्यप म्हणाला.

“कंगनाजवळ जेव्हा काहीच काम नव्हतं तेव्हा मी ‘क्वीन’ चित्रपट बनवला. ‘तनू वेड्स मनू’ चित्रपटाचा खर्च भागत नव्हता तेव्हा त्या चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद राय यांना मी मदत केली होती. आनंद राय यांची एका गुंतवणूकदाराशी भेट घालून दिली होती. खोटं वाटत असेल तर विचारु शकतात. मी नाव घेऊन बोलतोय, पण जे खरं आहे ते मी बोलणारच”, असंदेखील अनुराग कश्यप म्हणाला.

Published On - 5:20 pm, Tue, 21 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI