AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drugs Case | चौकशीची दुसरी फेरी, गॅब्रिएला पुन्हा एनसीबी कार्यालयात दाखल!

बुधवारी (11 नोव्हेंबर) तब्बल 6 तासांच्या चौकशीनंतर गॅब्रिएला एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली होती.

Drugs Case | चौकशीची दुसरी फेरी, गॅब्रिएला पुन्हा एनसीबी कार्यालयात दाखल!
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 12, 2020 | 2:19 PM
Share

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी (Drugs Case) एनसीबीची धडक कारवाई अद्याप सुरूच आहे. अर्जुन रामपालची (Arjun Rampal) लिव्ह-इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्सला (Gabriella demetriades) शुक्रवारी (12 नोव्हेंबर) पुन्हा एकदा चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. एनसीबीच्या समन्सनुसार गॅब्रिएला डेमेट्रियड्स चौकशीच्या दुसऱ्या फेरीसाठी एनसीबी कार्यालयात (NCB Office) दाखल झाली आहे. आज (12 नोव्हेंबर) पुन्हा एकदा तिला प्रश्नोत्तरे केली जाणार आहेत. तर, शुक्रवारी अर्जुन रामपालची चौकशी होणार आहे (Arjun rampal’s girlfriend Gabriella demetriades arrives at ncb office for second part of prob).

बुधवारी (11 नोव्हेंबर) तब्बल 6 तासांच्या चौकशीनंतर गॅब्रिएला एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली होती. यावेळी पुन्हा एकदा गॅब्रिएलाची चौकशी होण्याची शक्यता वर्वण्यात आली होती. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्यांची लिव्ह-इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्स यांना एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावले होते.

या समन्सनुसार अर्जुन आणि गॅब्रिएलाला 11 नोव्हेंबरपर्यंत चौकशीसाठी हजर व्हायचे होते. आज (11 नोव्हेंबर) अर्जुन रामपालची चौकशी होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, गॅब्रिएला एकटीच एनसीबी कार्यालयात दाखल झाली होती. यावेळी अर्जुन रामपाल गैरहजर असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, आता शुक्रवारी (13 नोव्हेंबर) अर्जुन रामपालची चौकशी होणार असल्याचे कळते आहे (Arjun rampal’s girlfriend Gabriella demetriades arrives at ncb office for second part of prob).

एनसीबीची मोठी कारवाई

सोमवारी (9 नोव्हेंबर) अर्जुन रामपालच्या घरावर आणि आसपासच्या परिसरावर एनसीबी पथकाने छापा टाकला होता. या धाडीत अर्जुन रामपालच्या घराची तपासणी करण्यात आली. या दरम्यान त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल 7 ते 8 तास हे धाडसत्र सुरू होते. त्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या. तसेच, अर्जुनच्या वाहन चालकाला ताब्यात घेतल्याचे कळते आहे.

ड्रग्ज प्रकरणात अर्जुनच्या मेहुण्याचे नाव

या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान त्याचे नाव समोर आल्याने अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र, आता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

(Arjun rampal’s girlfriend Gabriella demetriades arrives at ncb office for second part of prob)

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी