एकाच केंद्रावर मतदान, धनंजय मुंडे म्हणाले विजय निश्चित, प्रितम मुंडे म्हणतात, गुलाल आमचाच

| Updated on: Dec 01, 2020 | 2:22 PM

यावेळी दोन्ही नेत्यांनी आमचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया दिली. (Aurangabad Graduate Constituency Election dhananjay munde pritam munde cast voting in same booth) 

एकाच केंद्रावर मतदान, धनंजय मुंडे म्हणाले विजय निश्चित, प्रितम मुंडे म्हणतात, गुलाल आमचाच
Follow us on

बीड : औरंगाबाद (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतिश चव्हाण आणि भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे. विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. या निवडणुकीतील औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या प्रितम मुंडे यांनी मतदान केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी आमचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया दिली. (Aurangabad Graduate Constituency Election dhananjay munde pritam munde cast voting in same booth)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांनी बीडमधील परळी येथील गाढे पिंपळगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतिश चव्हाण यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच सतिश चव्हाण हे पदवीधर मतदारसंघात हॅट्रिक साधतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

तर पदवीधर मतदार संघातील ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. कोरोना काळामध्ये मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो याबद्दल शंका होती. मात्र मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गुलाल आमचाच असेल असा विश्वास खासदार पितम मुंडे यांनी व्यक्त केला. तर बंडखोर उमेदवार रमेश पोकळे यांनी निवडणुक लढ्यामुळे त्याचा निश्चितच परिणाम होईल, असे त्या म्हणाल्या

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अर्थातच महाविकासआघाडीने एकत्रित ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील या नव्या समीकरणांमुळे ही निवडणूक फार चुरशीची बनली आहे.

हेही वाचा – औरंगाबाद पदवीधर मतदरासंघाची लढाई भाजपसाठी अवघड

औरंगाबाद (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपचे मनसुबे यंदा धुळीस मिळण्याची शक्यता जास्त आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना या मतदारसंघात भाजपसाठी प्रतिकूल गोष्टी घडताना दिसत आहेत. भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि थेट राष्ट्रवादीत सामील झाले. (Aurangabad Graduate Constituency Election dhananjay munde pritam munde cast voting in same booth)

संबंधित बातम्या : 

अनैसर्गिक गोष्ट फार काळ टिकत नाही, महाविकास आघाडीचं सरकार अंतर्गत कलहातून पडणार, हर्षवर्धन पाटलांचा दावा

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करणार, महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा दावा