AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनैसर्गिक गोष्ट फार काळ टिकत नाही, महाविकास आघाडीचं सरकार अंतर्गत कलहातून पडणार, हर्षवर्धन पाटलांचा दावा

अंतर्गत कलहामुळे हे मविआ सरकार कोसळणार असल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला. Harshwardhan Patil MVA Government

अनैसर्गिक गोष्ट फार काळ टिकत नाही, महाविकास आघाडीचं सरकार अंतर्गत कलहातून पडणार, हर्षवर्धन पाटलांचा दावा
| Updated on: Dec 01, 2020 | 12:10 PM
Share

पुणे : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे मतदान केले. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार अनैसर्गिकरित्या निर्माण झाले आहे. अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळणार असल्याचा दावा पाटील यांनी केला. (Harshwardhan Patil said MVA Government collapse due to internal issues)

एखादी गोष्ट अनैसर्गिक घडत असेल तर ती फार काळ टिकत नाही हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे हे सरकार अंतर्गत कलहामुळेच पडेल. या निवडणुकीच्या निमित्तानं हे कलह दिसून आले आहेत. त्यातूनच हे सरकार पडणार असून त्यासाठी आम्हाला काही करण्याची आवश्यकता नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. विधानपरिषद निवडणुकीत सरकारमधील कलह समोर आले आहेत. सरकारच्या प्रतिनिधींना बदल्या करण्यामध्येच रस असल्याची टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. हे अनैसर्गिक सरकार स्थापन होऊन एक वर्ष झालं आहे. त्यांच्याविरोधात जनमत व्यक्त करण्याची ही निवडणूक आहे. त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाचे निवडणूक महत्वाची आहे. पदवीधरचे तीन, शिक्षकचे दोन आणि धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज संस्था या सहा ठिकाणी भाजपचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला आहे. (Harshwardhan Patil said MVA Government collapse due to internal issues)

कोरोना, अतिवृष्टी, आरक्षणावर सरकारला अपयश

हर्षवर्धन पाटील यांनी भाजप आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत असताना केवळ द्वेषातून हे सरकार निर्माण झाल्याची टीका केली. महाविकास आघाडी सरकारनं वर्षभरात कोरोना काळात कोणतीही मदत केली नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानांतर कसल्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाच्या मुद्यावर अराजक माजलं आहे. कोरोना, अतिवृष्टी, आरक्षण अशा सर्वच विषयांवर हे सरकार अपयशी ठरलं आहे.. त्यामुळं या सरकारच्या विरोधात कौल देण्यासाठी म्हणून ही निवडणूक उत्तम व्यासपीठ आहे, असं सांगितले.

एखादी गोष्ट अनैसर्गिक घडत असेल तर ती फार काळ टिकत नाही हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे हे सरकार अंतर्गत कलहामुळेच पडेल. या निवडणुकीच्या निमित्तानं हे कलह दिसून आले आहेत. त्यातूनच हे सरकार पडणार असून त्यासाठी आम्हाला काही करण्याची आवश्यकता नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या: 

विधानपरिषदेच्या निकालाने राज्याचे राजकारण बदलणार का? फडणवीस हसून म्हणाले…

बॉलिवूड मुंबईतून कोणीही नेऊ शकत नाही, योगी आदित्यनाथ अभ्यासासाठी येत असावेत : चंद्रकांत पाटील

(Harshwardhan Patil said MVA Government collapse due to internal issues)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.