IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीत भारत हरणार नाही, ‘हे’ तीन पुरावे बघा

| Updated on: Jan 16, 2021 | 10:45 AM

वॉशिंगटन सुंदर, टी. नटराजन आणि शार्दुल ठाकूर यांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे ब्रिस्बेन कसोटीमधील ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 369 धावांवर संपुष्टात आला आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीत भारत हरणार नाही, हे तीन पुरावे बघा
Follow us on

ब्रिस्बेन : वॉशिंगटन सुंदर, टी. नटराजन आणि शार्दुल ठाकूर यांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे ब्रिस्बेन कसोटीमधील ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 369 धावांवर संपुष्टात आला आहे. तर भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात वाईट झाली आहे. सुरुवातीलाच भारताने सलामीवीर शुभमन गिलची विकेट गमावली. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ बॅकफुटवर आहे. सुरुवातीपासूनच भारत या सामन्यात पिछाडीवर आहे, त्यामुळे भारताच्या या सामन्यातील विजयाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. तसेच कांगारुंनी ब्रिस्बेनमध्ये आतापर्यंत कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. ब्रिस्बेन हा कांगारुंचा बालेकिल्ला राहिला आहे. कांगारुंनी ब्रिस्बेनमध्ये 32 वर्षांपासून एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे कांगारुंचा या मैदानावरील विक्रम फार चांगला आहे. तर टीम इंडियाची या मैदानात विशेष अशी कामगिरी नाही. तरीदेखील असा दावा केला जात आहे की, भारत या सामन्यात जिंकणार आहे. त्यासोबत काही आकडेवारीदेखील मांडली जात आहे. (IND vs AUS: India chances to Win Brisbane Test)

ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडिया अनुभवहीन गोलंदाजांसह मैदानात उतरली होती. परंतु या नवख्या गोलंदाजांनी कसलेली गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारून दिली नाही. भारताच्या युवा गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 369 धावांवर संपुष्टात आणला. टीम इंडियाचं आणि 369 धावसंख्येचं एक अनोखं नातं आहे. भारताने जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्या डावात 369 धावांमध्ये रोखलं आहे, त्या सामन्यांमध्ये भारत पराभूत झालेला नाही.

भारतीय संघाने सर्वात आधी ऑस्ट्रेलियन संघाला 1967 मध्ये अॅडलेड येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात 369 धावांमध्ये रोखलं होतं. तो सामना भारतीय संघाने जिंकला होता. त्यानंतर 2004 मध्ये चेन्नईमध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 369 धावांमध्ये संपुष्टात आणला होता. हा सामना ड्रॉ झाला. 2012 मध्ये पर्थ येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन देशांमध्ये कसोटी सामना खेळवण्यात आला होता. त्यावेळी भारताने ऑस्ट्रेलिला 369 धावांमध्ये ऑल आऊट केलं होतं. हा सामना भारताने जिंकला होता. आज पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 369 धावांमध्ये रोखला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही भारतीय संघ पराभूत होणा नाही, असं बोललं जात आहे.

यामध्ये अजून एक विशेष बाब म्हणजे आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध कोणतीही धावसंख्या दोनपेक्षा अधिक वेळा उभारलेली नाही. केवळ 369 ही एकमेव धावसंख्या अशी आहे जी आतापर्यंत चार वेळा उभारली आहे. त्यामुळे ही बाब भारतासाठी चांगली आहे, असे बोलले जात आहे.

ब्रिस्बेन कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. कालच्या 5 बाद 274 धावसंख्येनंतर आज सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने धावफलकावर आरामात त्रिशतक झळकावलं. काल खेळ संपला तेव्हा नाबाद असलेल्या कॅमरॉन ग्रीन आणि कर्णधार टीम पेन या दोघांनी 98 धावांची भागिदारी रचत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच केली. परंतु आजच्या दिवसातील सुरुवातीच्या 12 षटकानंतर भारतीय गोलंदाजांनी गियर बदलला. 99 षटकात 5 बाद 310 वर असलेल्या ऑस्ट्रेलियाची 102 षटकात 8 बाद 315 अशी अवस्था केली. त्यानंतर नेथन लायन आणि मिचेल स्टार्कने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली, मात्र वॉशिंग्टन सुंदरने लायनला माघारी धाडले. त्यानंतर 369 धावांवर भारताला दहावं यश मिळालं. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबूशेनने सर्वाधिक 108 धावांचं योगदान दिलं. तर भारताकडून वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजला एक विकेट घेता आली.

तत्पूर्वी, काल ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कांगारुंनी पहिल्या 2 विकेट्स झटपट गमावल्या. फलंदाजीसाठी आलेल्या कांगारुंना मोहम्मद सिराजने पहिल्या ओव्हरमध्ये पहिला झटका दिला. सिराजने डेव्हिड वॉर्नरला रोहित शर्माच्या हाती 4 धावांवर कॅच आऊट केलं. यानंतर शार्दूल ठाकूरने मार्कस हॅरिसला 5 धावांवर आऊट केलं. यानंतर मार्नल लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. ही जोडी तोडायला वॉशिंग्टन सुंदरला यश आले. सुंदरने स्टीव्ह स्मिथला 36 धावांवर रोहित शर्माच्या हाती झेलबाद केलं.

संबंधित बातम्या

ऑस्ट्रेलियाचे प्रेक्षक सुधरेनात, ब्रिस्बेनमध्ये सिराज आणि सुंदरला शिव्या

क्रिकेट खेळतोय की आबाधुबी? पृथ्वीने फेकलेला चेंडू रोहितच्या हातावर आदळला, आणि….

टीम इंडियामागे दुखापतींचं ग्रहण कायम, आता ‘या’ खेळाडूला दुखापत