ऑस्ट्रेलियाचे प्रेक्षक सुधरेनात, ब्रिस्बेनमध्ये सिराज आणि सुंदरला शिव्या

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी पुन्हा एकदा बेशिस्त वर्तन करत भारताच्या दोन खेळाडूंना शिवीगाळ केली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:03 PM, 15 Jan 2021
ऑस्ट्रेलियाचे प्रेक्षक सुधरेनात, ब्रिस्बेनमध्ये सिराज आणि सुंदरला शिव्या

ब्रिस्बेनभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी पुन्हा एकदा बेशिस्त वर्तन करत भारताच्या दोन खेळाडूंना शिवीगाळ केली. ब्रिस्बेन कसोटीत भारताचे फिल्डर बॉन्ड्रीलाईनवर फिल्डिंग करत असताना ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी स्पिनर वॉशिंग्टन सुंदर आणि जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजला शिवीगाळ केली. (India Vs Australia Brisbane test Washington Sundar And Mohammad Siraj Abused Australian spectators)

सिडनी कसोटीत देखील ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंना शिवीगाळ करत त्यांच्याशी बेशिस्त वर्तन केलं होतं. सिडनीची पुनरावृत्ती आज पुन्हा एकदा ब्रिस्बेन कसोटीत पाहायला मिळाली. वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करत त्यांना शिवीगाळ केली. सिडनी मॉर्निंग हेराल्डने तसं वृत्त दिलं आहे.

सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, काही प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली. तसंच सिराज आणि सुंदरविषयी काही प्रेक्षक सातत्याने अपमानजनक शब्द वापरत होते. आज विशेष म्हणजे ऑफ स्पिनर वॉश्गिंटन सुंदरने कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू केला. त्याच्या डेब्यूच्याच दिवशी आज असा प्रकार घडलेला पाहायला मिळाला.

लागोपाठ दुसऱ्या वेळी मोहम्मद सिराजला अपमानास्पद टिप्पणीला सामोरे जावे लागले. याअगोदर सिडनी टेस्टमध्ये काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी मोहम्मद सिराजवर अपमानास्पद टिप्पणी केली होती. सिडनी टेस्टच्या चौथ्या दिवशी एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असूनही भारतीय खेळाडूंना अपमानास्पद शेरेबाजी ऐकावी लागली होती.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसखेर 5 विकेट्स गमावून 274 धावा केल्या आहेत. खेळ संपला तेव्हा कॅमरॉन ग्रीन 28 तर कर्णधार टीम पेन 38 धावांवर नाबाद होते. ऑस्ट्रेलिाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

हे ही वाचा

Aus vs Ind, 4th Test, 1st Day HighLights : मार्नस लाबुशेनची शतकी खेळी, पहिल्या दिवसखेर ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 274 धावा

Aus vs Ind, 4th Test | क्रिकेट खेळतोय की आबाधुबी? पृथ्वीने फेकलेला चेंडू रोहितच्या हातावर आदळला, आणि….