व्यापारी नरमले, काळ्या झेंड्यांऐवजी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देणार

सचिन पाटील

|

Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

अयोध्या (लखनऊ):  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी आक्रमक झालेल्या अयोध्येतील व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेतलं आहे. उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी मागे घेतला आहे. आता उद्धव ठाकरेंचं पुषपगुच्छ देऊन स्वागत करण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. फैजाबादच्या संयुक्त व्यापार मंडळाने विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभेला विरोध केला होता, तसंच उद्धव ठाकरे यांना काळे […]

व्यापारी नरमले, काळ्या झेंड्यांऐवजी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देणार

अयोध्या (लखनऊ):  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी आक्रमक झालेल्या अयोध्येतील व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेतलं आहे. उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी मागे घेतला आहे. आता उद्धव ठाकरेंचं पुषपगुच्छ देऊन स्वागत करण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. फैजाबादच्या संयुक्त व्यापार मंडळाने विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभेला विरोध केला होता, तसंच उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता तो मागे घेण्यात आला आहे.

शिवसेनेचा इतिहास पाहता अयोध्येतील स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शिवसेना कट्टरतावादी आणि आक्रमक असल्याची भावना स्थानिकांची आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मनात भीती असल्याचं म्हटलं जात होतं. शिवाय गर्दीमुळे व्यापाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे व्यापाऱ्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला होता.  मात्र आता तो निर्णय त्यांनी मागे घेतला आहे.

शिवसैनिक अयोध्येत दाखल

दीड दिवसाच्या प्रवासानंतर शिवसैनिक शुक्रवारी रात्री अयोध्येत दाखल झालेत. जय श्रीरामच्या घोषणा देत शिवसैनिक रामजन्मभूमीवर दाखल झाले. शिवसैनिकांनी जय श्री रामच्या घोषणांनी स्टेशन परिसर दणाणून सोडला. मुंबईहून गेलेल्या ट्रेनमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त शिवसैनिक आहेत. तर नाशिकहून निघालेल्या ट्रेनमध्येही एवढेच किंवा यापेक्षा जास्त शिवसैनिक आहेत. नाशिकहून निघालेली ट्रेन अयोध्येत पोहोचण्यासाठी उशिर झाला.

उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज सहकुटुंब अयोध्येत पोहोचणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रापासून ते अयोध्येपर्यंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारल्याचं चित्रं आहे. उद्धव ठाकरे आज अयोध्येला रवाना होणार आहेत. पण, त्याआधीच त्यांनी शिवनेरी किल्ल्यावरुन आपल्या दौऱ्याचं रणशिंग फुंकलंय. अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंसोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही असतील.

उद्धव ठाकरेंचा दौरा कसा असेल?

शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचा कलश घेऊन उद्धव ठाकरे शनिवारी दुपारी अयोध्येत पोहोचतील. शिवनेरीवर बाल शिवाजी आणि जिजामाता यांना अभिवादन करुन उद्धव ठाकरेंनी माती सोबत घेतली होती.

अयोध्येतल्या क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे वेगवेगळे समाज, भोजपुरी सभा यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. ‘लक्ष्मण किला’वर उद्धव ठाकरे यांचा साधूसंतांकडून सत्कार होईल. रामचरित मानस आणि रामललांची मूर्ती घेऊन उद्धव ठाकरे येणार आहेत. पूजेनंतर ते साधूसंतांकडून आशीर्वाद घेतील. ‘लक्ष्मण किला’वरील कार्यक्रम संपल्यानंतर उद्धव ठाकरे चालत शरयूच्या काठावर जाऊन आरती करतील.

 प्रत्येक अपडेट टीव्ही 9 मराठीवर

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची प्रत्येक अपडेट टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर आणि चॅनलवर पाहता येणार आहे. टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी मुंबईपासून ते अयोध्येपर्यंतची प्रत्येक अपडेट प्रेक्षक आणि वाचकांपर्यंत पोहोचवणार आहेत. लाईव्ह अपडेटसाठी टीव्ही 9 मराठीला @tv9marathi या नावाने ट्विटर आणि फेसबुकला फॉलो करु शकता. तसंच लाईव्ह टीव्हीसाठी http://tv9marathi.com/live-tv लॉग ऑन करा.

संबंधित बातम्या 

अयोध्या LIVE: उद्धव ठाकरे सहकुटुंब जाणार, राम मंदिरासाठी चांदीची वीट देणार    

उद्धव ठाकरे यांचा दौरा

– उद्धव ठाकरे आज दुपारी खासगी विमानाने अयोध्येत पोहोचतील. तिथे विमानतळावर त्यांचं स्वागत होईल

–  दुपारी तीनच्या सुमारास अयोध्येतील लक्ष्मण किला इथं आज संतमहंतांच्या उपस्थितीत आशीर्वचन सोहळा होणार आहे.

– उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता शरयू घाटावर आरती करतील

– दुसऱ्या दिवशी 25 तारखेला रामजन्मभूमीला पूजा करतील

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI