आधी आयुर्वेदीक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी, आता आयुष मंत्रालयाचं निर्णयावर स्पष्टीकरण

आयुष मंत्रालयाने सेंट्रल काऊंसिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या आयुर्वेदीक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी देण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण दिलंय.

आधी आयुर्वेदीक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी, आता आयुष मंत्रालयाचं निर्णयावर स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 12:21 AM

नवी दिल्ली : आयुष मंत्रालयाने सेंट्रल काऊंसिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या आयुर्वेदीक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी देण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण दिलंय. यानुसार आता आयुर्वेदात पदव्युत्तर केलेल्या विद्यार्थ्यांना ईएनटी, डोळे आणि दात अशा अनेक प्रकारच्या सामान्य शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मंत्रालयाने म्हटलं, “या अधिसूचनेत केवळ 58 विशेष शस्त्रक्रियांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. शल्य आणि शलाक्य चिकित्सेचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर कोणतीही शस्त्रक्रिया करता येणार नाही (Ayush Ministry clarification over permission of Surgery to Homeopathic doctor).”

आयुष मंत्रालयाने म्हटलं, “संबंधित अधिसूचना कोणत्याही धोरणात्मक बदलाचा संकेत देत नाही. 2016 च्या आधीच्या नियमांमध्ये जे काही प्रासंगिक बदल आहेत त्याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. आयुर्वेदीक महाविद्यालयांमध्ये शल्य आणि शलाक्य हे आधीपासूनच स्वतंत्र विभाग आहेत. या अभ्यासक्रमात आधीपासून काही शस्त्रक्रिया केल्या जातात.”

सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार आता आयुर्वेदिक अभ्यासक्रमात शस्त्रक्रिया प्रशिक्षणाचाही भाग समाविष्ट करण्यात येईल. यासाठी या कायद्याच्या नावात दुरुस्ती करुन ‘भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद (पदव्युत्तरर आयुर्वेदीक शिक्षण) संशोधन विधेयक, 2020 असं करण्यात येणार आहे.

नवे नियमा काय सांगतात?

नव्या नियमांनुसार आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करतानाच शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेशी संबंधित इतर प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या विद्यार्थ्यांना दोन टप्प्यात हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात पहिला भाग एमएस (आयुर्वेद) जनरल सर्जरी आणि एमएस (आयुर्वेद) शालक्य तंत्र (डोळे, कान, नाक, घसा, डोके आणि दात रोग) यासारख्या शस्त्रक्रियांचा समावेश असेल. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) यावर बोलताना या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये काहीशा गोंधळाची स्थिती तयार होऊ शकते, अशी शंका उपस्थित केली आहे. त्यानंतरच आयुष मंत्रालयाचं स्पष्टीकरण आलं आहे.

संबंधित बातम्या :

Patanjali Coronil | ‘कोरोनिल’ची कोरोनाग्रस्तांवर चाचणी, आरोग्य विभागाची रुग्णालयाला नोटीस

तुळशीची 4 पानं, दालचिनी 2, रोग प्रतिकार शक्तीसाठी आयुष मंत्रालयाचा आर्युर्वेद काढा कसा बनवाल?

आयुष फॉर कोविड-19 टास्क फोर्स होणार गठीत, आयुष्य मंत्रालयाकडून प्रस्ताव सादर

Ayush Ministry clarification over permission of Surgery to Homeopathic doctor

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.