AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबासाहेब पुरंदरेंना ‘पद्मविभूषण’ हा महाराष्ट्राचा अपमान : संभाजी ब्रिगेड

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पद्मविभूषण पुरस्कारावरुनही आता वादाला सुरुवात झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज बाबासाहेब पुरंदरे यांना देशाचा दुसरा सर्वात मोठा पुरस्कार ‘पद्मविभूषण’ घरी जाऊन प्रदान केला. त्यानंतर आता संभाजी ब्रिगेडने त्याला आक्षेप घेतला आहे. “बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण देणे हा महाराष्ट्राचा अपमान, हे चुकीचा इतिहास लिहिण्याबद्दल’चे पद्मविभूषण आहे”, अशी […]

बाबासाहेब पुरंदरेंना 'पद्मविभूषण' हा महाराष्ट्राचा अपमान : संभाजी ब्रिगेड
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM
Share

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पद्मविभूषण पुरस्कारावरुनही आता वादाला सुरुवात झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज बाबासाहेब पुरंदरे यांना देशाचा दुसरा सर्वात मोठा पुरस्कार ‘पद्मविभूषण’ घरी जाऊन प्रदान केला. त्यानंतर आता संभाजी ब्रिगेडने त्याला आक्षेप घेतला आहे.

“बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण देणे हा महाराष्ट्राचा अपमान, हे चुकीचा इतिहास लिहिण्याबद्दल’चे पद्मविभूषण आहे”, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली.  महाराष्ट्रातला शिवद्रोही पुरस्कार म्हणून या पुरस्काराकडे पाहिलं गेलं पाहिजे, आज काळा दिवस आहे, असाही घणाघात त्यांनी केला.

पुरंदरे यांना आरएसएसकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाद्वारे बदनाम करण्याची सुपारी दिली गेली. सुपारी घेणाऱ्या पुरंदरे यांना ‘पद्मविभूषण’ देणे हा तमाम शिवप्रेमींचा अपमान आहे. हा पुरस्कार बदनामी करण्याचे सरकारचे अधिकृत सर्टिफिकेट आहे. हे विकृत आणि खोटा इतिहास लिहिण्याबद्दलचे पद्मविभूषण आहे, असं संतोष शिंदे म्हणाले.

बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण

बाबासाहेब पुरंदरे यांना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍या हस्‍ते पद्मविभूषण पुरस्‍कार त्‍यांच्‍या निवासस्‍थानी आदरपूर्वक प्रदान करण्‍यात आला. पुरंदरे यांना भारत सरकारने यंदा 2019 मध्‍ये पद्मविभूषण पुरस्‍कार जाहीर केला होता. 11 मार्च 2019 रोजी झालेल्या पुरस्‍कार प्रदान सोहळ्यास वैयक्तिक कारणास्‍तव. बाबासाहेब पुरंदरे उपस्थित राहू शकले नव्‍हते. त्‍यामुळे जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन पद्मविभूषण पुरस्‍कार ( पद्मविभूषण पदक, मानपत्र आणि सनद ) आदरपूर्वक प्रदान केलं. यावेळी तहसिलदार तृप्‍ती कोलते-पाटील यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.