AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या शेजारी देशात महाभयंकर आजार, एक चूक केल्याने घात, तब्बल 450 मुलांचा मृत्यू!

भारताच्या शेजारी देशात एका भयंकर आजाराने डोके वर काढले आहे. लहान मुलांना हा आजार होत आहे. लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्य उद्भवली आहे. त्यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.

भारताच्या शेजारी देशात महाभयंकर आजार, एक चूक केल्याने घात, तब्बल 450 मुलांचा मृत्यू!
measles diseaseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 19, 2026 | 9:29 PM
Share

Bangladesh Measles Disease : जगाने कोरोना या महासाथीचा कोप पाहिलेला आहे. या साथीच्या रोगामुळे जगभरात लाखो लोकांचा जीव गेला. आता या आजारावर लस आल्याने त्याचा प्रादुर्भाव थांबला आहे. एका लसीमुळे हा जीवघेणा आजारा थोपवता आलेला आहे. दरम्यान, लसीकरणाला गांभीर्याने न घेतल्याने आता भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशवर मोठं आणि भयानक संकट आलं आहे. या देशात जुन्याच एका आजाराने डोकं वर काढलं असून हा आजार लहान मुलांवर हल्ला करताना दिसतोय. विशेष म्हणजे वेळीच लसीकरणाला गांभीर्याने घेतलं असतं तर ही वेळ आली नसती, असं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.

या आजाराचे नेमके नाव काय आहे?

बांगलादेशात आता या आजारामुळे आतापर्यंत 450 पेक्षा जास्त लहान मुलं दगावले आहेत. तर 53 हजारांपेक्षा जास्त संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ज्या मुलांचे वय 5 वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांना विशेष रुपाने हा आजार होत असल्याचे समोर आले आहे. या आजाराला रोखणाऱ्या रसीचे बांगलादेशात अपुरे लसीकरण झालेले आहे. त्यामुळेच लहान मुलांना हा आजार होत आहे. लॅन्सेट मॅगझीनधील रिपोर्टनुसार बांगलादशात 2025 मध्ये साधारण 50 लाख लहान मुलांचे लसीकरण अर्धवट राहिलेले आहे. यातील साधारण 70 हजार अशी मुलं आहेत ज्यांना एकही लस देण्यात आलेली नाही.

गोवर आजार नेमका काय आहे?

काही लोक गोवर या आजाराकडे गांभीर्याने पाहात नाहीत. अनेकांना वाटतं की आपल्या मुलाला ताप आला आहे. लवकरच ताप निघून जाईल. परंतु नंतर गोवर मुलाच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतो. पाच वर्षांखालील मुलाला हा आजार होण्याची दाट शक्यता असते. हा एक संसर्गजन्य आजार आहे. एका व्यक्तीला गोवर झाल्यास त्याच्या संपर्कात येणाऱ्या अन्य दहा व्यक्तींपैकी जवळपास 9 व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता असते.

दरम्यान, प्रत्येक मुलाला गोवर आजारापासून रक्षण करणारी लस दिली पाहिजे, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जाते. भारतातही या आजाराला रोखणारी लस दिली जाते. पालकांनी आपल्या मुलांना ही लस जरूर द्यावी, असे आवाहन सरकारकडून केले जाते.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...