Health Food | शांत झोप मिळवण्यासाठी आहारात ‘या’ घटकांचा समावेश आवश्यक!

झोप पूर्ण झाल्याने बऱ्याच रोगांपासून शरीराचे संरक्षण होते, मेंदू स्थिर राहतो आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

Health Food | शांत झोप मिळवण्यासाठी आहारात ‘या’ घटकांचा समावेश आवश्यक!

मुंबई : शरीर निरोगी राहण्यासाठी चांगली झोप घेणे फार महत्वाचे आहे. झोप पूर्ण झाल्याने बऱ्याच रोगांपासून शरीराचे संरक्षण होते, मेंदू स्थिर राहतो आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. मानवी शरीराला 7-9 तासांची झोप आवश्यक असते. परंतु आपल्यापैकी बर्‍याच लोकांना चांगली झोप येत नाही आणि त्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडलेली असते. चांगल्या झोपेसाठी, आपल्याला आपला आहार बदलण्याची आवश्यकता आहे. आहारात या घटकांचा नियमित समावेश केला तर, आपल्या झोपेसंबंधित समस्या कमी होऊ शकतात. (Best healthy Food For Good sleep)

  • बदाम

बदाम आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. बदामांमध्ये बरेच पौष्टिक घटक आढळतात. नियमितपणे बदाम खाल्ल्याने मधुमेह आणि हृदयविकारा संबंधित समस्या दूर होतात. बदाम खाल्ल्याने शरीरात मेलाटोनिन हार्मोन तयार होतात, ज्यामुळे खूप चांगली झोप येते. याव्यतिरिक्त, बदाम मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे. मॅग्नेशियम शरीरात जळजळ आणि तणाव वाढवणाऱ्या कॉर्टिसॉल हार्मोनची पातळी नियंत्रित करते, ज्यामुळे शांत झोप येते. झोपेच्या आधी किमान 28 ग्रॅम बदाम खाणे फादेकारक ठरते.(Best healthy Food For Good sleep)

  • किवी

किवी कमी कॅलरीज असणारे एक पौष्टिक फळ आहे. किवीमध्ये फोलेट आणि पोटॅशियम देखील आढळतात. किवी खाल्ल्याने पाचन शक्तीत वाढ होते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. किवीमुळे सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स शांत झोपेसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराची जळजळ कमी होते आणि चांगली झोप लागते. झोपेची समस्या असलेल्या लोकांना झोपण्यापूर्वी मध्यम आकाराचे 1-2 किवी खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.(Best healthy Food For Good sleep)

  • अक्रोड

अक्रोडमध्ये 19 पेक्षा जास्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. अक्रोडमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मॅंगनीजदेखील मोठ्या प्रमाणता आढळते. याशिवाय ओमेगा 3, फॅटी अॅसिडस् आणि लिनोलिक अॅसिडदेखील अक्रोद्मध्ये आढळते. अक्रोडचे हे गुणधर्म हृदयाला सुरक्षित ठेवतात. तसेच कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवतात. संशोधनात असे दिसून आले आहे की, अक्रोडमध्ये लक्षणीय प्रमाणात मेलाटोनिन आढळते, ज्यामुळे झोपेची समस्या दूर होते. जर तुम्हालाही नीट झोप येत नसेल तर, झोपण्यापूर्वी अक्रोड नक्की खा.(Best healthy Food For Good sleep)

  • पांढरा तांदूळ (भात)

देशातील बर्‍याच भागात पांढरे तांदूळ म्हणजेत भाताचा आहारात नियमित समावेश असतो. पांढर्‍या तांदळामध्ये संतुलित प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. तांदूळ हा ग्लाइसेमिक इंडेक्स फूड मानला जातो. असे म्हटले जाते की, उच्च ग्लाइसेमिक इंडेक्सयुक्त अन्न खाल्ल्यास चांगली झोप येते. म्हणूनच, रात्रीच्या आहारात भाताचा समावेश अवश्य करावा. त्याने निद्रानाशची समस्या दूर होण्यास मदत होईल.

(Best healthy Food For Good sleep)

संबंधित बातम्या : 

Sleeping Disorder | कमी झोपेमुळे ‘स्लीप एपनिया’चा धोका, जाणून घ्या लक्षणांबद्दल…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI