सायकल, मोटारसायकल आणि कार एकत्र करुन पुण्यात ‘बायसीकल बस’

पुणे : सध्या देशात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज जवळपास प्रत्येकाच्या घरी एकतरी वाहन असतं. इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनांच्या वापरामुळे पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होतो आहे, तसेच या दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे शारीरिक हालचालीही कमी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकांना सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात बायसीकल बसचा प्रयोग करण्यात आला आहे. या बायसीकल […]

सायकल, मोटारसायकल आणि कार एकत्र करुन पुण्यात ‘बायसीकल बस’
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

पुणे : सध्या देशात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज जवळपास प्रत्येकाच्या घरी एकतरी वाहन असतं. इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनांच्या वापरामुळे पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होतो आहे, तसेच या दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे शारीरिक हालचालीही कमी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकांना सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात बायसीकल बसचा प्रयोग करण्यात आला आहे. या बायसीकल बसला सायकल, मोटारसायकल आणि कारची सांगड घालत तयार करण्यात आले आहे. पुण्यातील मिलींद कुलकर्णी यांनी या बायसीकल बसची निर्मिती केली आहे.

ही बायसीकल बस लांबून एखाद्या कार सारखीच दिसते. याच्या आत सायकल सारखी रचना करण्यात आली आहे. यात बसायला सीट आहे, पायडल आहे. सायकल सारख पायडल मारल्यावर ही बायसीकल बस धावू लागते.

बायसीकल बसची रचना अत्यंत सहजसोपी आहे. काही जुने पार्ट आणि काही नव्या सुट्ट्या भागापासून बायसीकल बस तयार केली जाते. कोथरुडसह वेगवेगळ्या वर्कशॉपमध्ये या बसचं काम झालंय. साधारण दीड लाख खर्च या बायसीकल बससाठी येतो. याला तयार व्हायला एका महिन्याचा कालावधी लागतो.

विकसीत देशात मोठ्या प्रमाणावर बायसीकल बसचा वापर होतो. मात्र भारतात बायसीकल बसचा वापर होत नाही. या बायसीकल बसमधून पाच ते सहा जण सहज प्रवास करु शकतात. तसेच गरजेनुसार कमी अधिक संख्येची बायसीकल बसही बनवता येते.

बायसीकल बसमुळे प्रदुषण होत नाही. शारीरिक हालचाल होते. बायसीकल बसचा प्रवास सायकलपेक्षा सुरक्षित असल्याचा दावाही निर्मात्यांनी केला आहे. सध्या ही बायसीकल बस प्रायोगिक तत्त्वावर बनवण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.