पाऊस LIVE : सांगलीच्या कारागृहात पुराचे पाणी, 390 कैदी पुराच्या पाण्यात अडकले

सचिन पाटील

सचिन पाटील | Edited By:

Updated on: Aug 08, 2019 | 1:04 PM

[svt-event title=”सांगलीत बचावकार्यादरम्यान बोट उलटली, 14 जणांचा बुडून मृत्यू” date=”08/08/2019,1:04PM” class=”svt-cd-green” ] सांगलीमध्ये महापुराने (Sangli Flood) थैमान घातलं असतानाच बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना बोट उलटून (Boat Overturn) 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. [/svt-event] [svt-event title=”सांगलीच्या कारागृहात पुराचे पाणी, 390 कैदी पुराच्या पाण्यात अडकले” date=”08/08/2019,9:10AM” class=”svt-cd-green” […]

पाऊस LIVE : सांगलीच्या कारागृहात पुराचे पाणी, 390 कैदी पुराच्या पाण्यात अडकले

[svt-event title=”सांगलीत बचावकार्यादरम्यान बोट उलटली, 14 जणांचा बुडून मृत्यू” date=”08/08/2019,1:04PM” class=”svt-cd-green” ] सांगलीमध्ये महापुराने (Sangli Flood) थैमान घातलं असतानाच बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना बोट उलटून (Boat Overturn) 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. [/svt-event]

[svt-event title=”सांगलीच्या कारागृहात पुराचे पाणी, 390 कैदी पुराच्या पाण्यात अडकले” date=”08/08/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ] सांगलीत आलेल्या पुराचा फटका आता तेथील कैद्यांनाही बसला आहे. सांगलीच्या जेलमध्येही पुराचे पाणी शिरले आहे. या जेलमध्ये एकूण 390 कैदी आहेत. त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी बोटी उपलब्ध करुन द्या, अशी मागणी जेलर यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोयना धरणातील पाण्यात घट” date=”08/08/2019,9:06AM” class=”svt-cd-green” ] कोयना धरणात येणारे पाणी कमी झालं आहे. तसेच पाऊस ही कमी झाला आहे. सध्या धरणात 102 tmc पाणीसाठा आहे. कोयना धरणातून 98 हजार 881 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. [/svt-event]

[svt-event title=”पूरपरिस्थितीमुळे आता आजारांची साथ, पूरग्रस्तांना उलट्या आणि जुलाब” date=”08/08/2019,9:00AM” class=”svt-cd-green” ] सांगलीत महापूर आल्याने अनेकजण या पाण्यात अडकले आहेत. पण आता यामुळे तेथील नागरिकांमध्ये आजाराची साथ पसरत आहे. अनेकांना उलट्या आणि जुलाब होत आहे. आजारी लोकांना दवाखान्यात पाठवण्यात आलं आहे. तसेच इस्लामपूर कम्पमधील एकाला अर्धांगवायूचा झटका आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात पेट्रोल, भाज्यांचा तुटवडा” date=”08/08/2019,8:52AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात महापुरामुळे मोठा फटका शहरी भागामध्ये बसला आहे. शहरात पेट्रोल आणि भाजीपाल्याचा तुटवडा पडला आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पात्रांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 30 ते 35 गावांचा संपर्क तुटला आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री साताऱ्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार” date=”08/08/2019,8:19AM” class=”svt-cd-green” ] सातारा, कराडमध्ये नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे अनेकजण दगावली आहेत. यासाठी मुख्यमंत्री महा जनादेश यात्रा सोडून साताऱ्यामध्ये जाणार आहेत. येथील पूरग्रस्तांनाही मुख्यमंत्री भेटणार असल्याचे बोललं जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”देवगडमध्ये नितेश राणेंकडून मोफत दुधाचे वाटप” date=”08/08/2019,8:12AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी परिसरात पूरग्रस्त परिस्थितीमुळे इंधन, दूध आणि भाज्यांचा तुटवडा पडला आहे. त्यामुळे देवगडमध्ये ठिकठिकाणी पाच हजार लिटर दुधाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच बेळगावहून भाजी मागवून वाटप केले जाणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी इंधन, दुधाचा आणि भाज्यांचा तुटवडा” date=”08/08/2019,8:06AM” class=”svt-cd-green” ] पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल तुटवडा झाल्याने पेट्रोल पंप बद आहेत. गोकुळ, कृष्णा, वारणा आणि अमूल दूधाच्या गाड्या रत्नागिरीत न आल्याने जिल्ह्यात दूध टंचाई झाली आहे. मिरज मार्गावरील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने दुसऱ्या दिवशीही दूध रत्नागिरीत पोहचू शकले नाही. [/svt-event]

[svt-event title=”पुरामुळे पुणे-बंगळुरु महामार्ग बंद, औद्योगिक क्षेत्राला मोठा आर्थिक फटका” date=”08/08/2019,7:54AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर आणि सांगलीतील पुरपरिस्थितीमुळे पुणे-बंगळुरु मार्ग आणि त्याच्या बाजूने वाहणाऱ्या पाण्याची धोक्याची पातळी वाढली. या पुरपरिस्थितीमुळे उद्योग विश्वात मोठा आर्थिक फटका बसला आहे. औद्योगिक माल वाहतूक ट्रक गेल्या 4 दिवसांपासून एकाच जागेवर थांबलेले आहेत. पुण्याच्या एमआयडीसी परिसरात हे सर्व अवजड वाहने आणि ट्रक थांबवण्यात आले आहेत. यामुळे येथे ट्रकच्या रांगा लागलेल्या आहेत. [/svt-event]

[svt-event title=”साताऱ्यात पुराच्या पाण्यात तरुण वाहून गेला” date=”08/08/2019,7:40AM” class=”svt-cd-green” ] साताऱ्यात पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून गेला. नायगाववरुन केसुर्डी गावी जात असताना ही घटना घडली. सतीश सोमा कचरे असं वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. [/svt-event]

[svt-event title=”कराडमध्ये पुरस्थिती कायम” date=”08/08/2019,7:38AM” class=”svt-cd-green” ] कराडमध्ये पुरस्थिती अजूनही कायम आहे. शहरातील पाणी पातळीत वाढ नसून रिपरिप पाऊस सुरु आहे. कोयनेतील संपर्क यंत्रणा कालपासून बंद आहे. [/svt-event]

[svt-event title=”सांगलीतील कृष्णा नदीला महापूर, 21 हजार जनावरांना स्थलांतरीत” date=”08/08/2019,7:29AM” class=”svt-cd-green” ] कृष्णा नदीला महापूर आल्यामुळे सांगली जिल्ह्यातील परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सांगलीच्या आयुर्विन पुलाजवळ नदीच्या पाणी पातळीत 56 फूट 8 इंच वाढ झाली आहे. 21 हजार 500 हेक्टर जमीन पुराच्या पाण्याखाली गेली आहे. अजूनही एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरु आहे. [/svt-event]

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI