पुलवामा हल्ल्याने संपूर्ण देशाचं रक्त खवळलं, कठोर धडा शिकवण्याची मागणी

पुलवामा हल्ल्याने संपूर्ण देशाचं रक्त खवळलं, कठोर धडा शिकवण्याची मागणी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये गुरुवारी दुपारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 30 पेक्षा अधिक सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. हल्ल्यानंतर राजयकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री आणि माजी सेनाप्रमुख विके सिंह यांनी सांगितले की, शहीदांच्या रक्ताच्या एक एक थेंबाचा आम्ही बदला घेणार. या घटनेमुळे रक्त खवळले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. काँग्रेस नेता रणदीप सुरजेवाला यांनी या घटनेनंतर थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही ट्वीट करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी DG CRPF आरआर भटनागर यांच्यासोबत घटनेबाबतची चर्चा केली.

घटनेवर कोण काय म्हणालं?

पुलवामामध्ये झालेल्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध केला आहे. शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. तसेच देश शहीदांच्या कुटुंबासोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पुलवामा हल्ल्यानंतर ट्वीट करत निषेध नोंदवला. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, या घटनेमुळे मला खुप दु:ख झालं आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी हल्ल्यानंतर ट्वीट करत या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद यांनी घेतली आहे. हा एक धक्कादायक हल्ला आहे. घाटीमध्ये पुन्हा एकदा 2004-05 सारखी परिस्थिती निर्माण होत आहे.

ओमर अब्दुल्ला यांच्याशिवाय महबूबा मुफ्ती यांनीही ट्वीट करत या घटनेचा निषेध केला. त्यांनी म्हटलं की, ही खुप दु:खदाय़क बातमी आहे. यामध्ये 12 जवान शहीद झाले आहेत. त्यांनी सांगितले की, या आतंकी हल्ल्यात निषेध करण्याशिवया काही शब्द नाहीत. समजत नाही की, आतंकवादांच्या या घटना संपवण्यासाठी आपल्याला अजून किती जवानांचे जीव गमवावे लागणार आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत या घटनेचा निषेध केला. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, या कठीण परिस्थिती देशाला एकत्र राहणे गरजेचे आहे. काँग्रेसनेता रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्वीट करत लिहलं की, पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला. उरी, पठानकोट आणि आता पुलवामा मोदी सरकारच्या नेतृत्वात दहशतवादी हल्ल्यांची यादी वाढत जात आहे.

 

कसा झाला हल्ला?

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. यावेळी CRPF च्या दोन बस वर त्यांनी निशाणा साधला. आतापर्यंत 20 पेक्षा अधिक जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत आणि 40 पेक्षा अधिक जवान जखमी आहेत. अनेक दिवसांनी घाटीमध्ये दहशतवाद्यांनी आईईडी धमाक्यांद्वारे जवानांवर हल्ला केला आहे.

व्हिडीओ : श्रीनगरमध्ये उरीनंतरचा सर्वात मोठा हल्ला, CRPF चे 20 जवान शहीद


Published On - 6:52 pm, Thu, 14 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI