Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात मोठा हंगामा, आणखी एका स्पर्धकाची ‘विकेट’!

सिद्धार्थ शुक्ला बाहेर पडल्यानंतर गौहर खान आणि हीना खान यांनी देखील घराबाहेर पडावे अशी घोषणा बिग बॉसने केल्याने स्पर्धक चांगलेच गोंधळले.

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात मोठा हंगामा, आणखी एका स्पर्धकाची ‘विकेट’!

मुंबई : यंदा बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांसह स्पर्धकांनाही रोज मोठे मोठे धक्के बसत आहेत. तूफानी सिनिअर्सच्या शेवटच्या टास्क दरम्यान हीना खान आणि गौहर खान यांच्या टीमने सिद्धार्थ शुक्ला आणि त्याच्या टीमला एकटे पाडले होते (Bigg Boss Latest Update). सिद्धार्थ आणि गौहरमध्ये वाददेखील पाहायला मिळाले होते. हा टास्क हरल्याने सिद्धार्थसह त्याच्या टीममध्ये सहभागी असलेले पवित्रा आणि एजाजदेखील घराबाहेर गेले आहेत. मात्र, यांच्यासोबत शहजाद देओलसुद्धा या खेळातून बाद झाला आहे.( Bigg Boss 14 Latest Update toofani seniors elimination)

हरल्यानंतरदेखील सिद्धार्थ शुक्लाने त्याच्या टीमचे कौतुक केले आहे. तिघांच्या घराबाहेर जाण्याने इतर स्पर्धक दुःखी झाले आहेत. निक्की तंबोलीकडे विशेषाधिकार असल्याने ती बेघर होण्यापासून सुरक्षित झाली आहे. सिद्धार्थच्या टीमने देखील त्याचे कौतुक केले.

तूफानी सिनिअर्सची एक्झिट

सिद्धार्थ शुक्ला बाहेर पडल्यानंतर गौहर खान आणि हीना खान यांनी देखील घराबाहेर पडावे अशी घोषणा बिग बॉसने केल्याने स्पर्धक चांगलेच गोंधळले. अचानक इतक्या लोकांच्या बाहेर जाण्याने घरातील इतर स्पर्धकांना धक्का बसला आहे. तूफानी सिनिअर्सच्या त्रासाला कंटाळले असले तर, त्यांच्या घराबाहेर जाण्याने स्पर्धक इमोशनल झालेले दिसले.( Bigg Boss 14 Latest Update toofani seniors elimination)

आणखी एक ट्विस्ट

या सगळ्या गोंधळादरम्यान घरात धोक्याची घंटा वाजायला सुरुवात होते. पीपीई कीट घातलेले काही लोक घरात दाखल होतात. सगळ्या स्पर्धकांना फेस शील्ड घालावे लागते. घरात सॅनिटायझेशन प्रक्रिया सुरू होते. यानंतर घराची दोन भागांत विभागणी होते. घराचा एक भाग ‘रेड झोन’ म्हणजेच धोकादायक भाग तर दुसरा ‘ग्रीन झोन’ म्हणजेच सुरक्षित भाग म्हणून विभागण्यात येतो. यानंतर घरात मोठा ट्विस्ट आला आहे. घराच्या ‘रेड झोन’मध्ये एजाज आणि पवित्रा पुनियाची घरवापसी झाली आहे.(Bigg Boss Latest Update)

बिग बॉसच्या घरात ‘चंद्रमुखी’ राज!

वाईल्ड कार्ड स्पर्धकांमध्ये नैना सिंह, शार्दुल पंडित आणि प्रतिक सहजपाल यांची नावे या स्पर्धकांमध्ये घेतली जात आहेत. मात्र, यात यादीत आता आणखी एक मोठे नाव सामील झाल्याचे कळते आहे. टीव्हीची ‘चंद्रमुखी चौटाला’ अर्थात अभिनेत्री कविता कौशिक (Kavita Kaushik) बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे.

या आधीही कविताच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, तिने या गोष्टी अफवा असल्याचे म्हणत माध्यमांच्या वृत्ताला फेटाळून लावले होते. मात्र, आता तिच्या एंट्रीवर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते आहे. कविता कौशिक मालिका विश्वापासून दूर गेली असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. बऱ्याचदा स्पष्टवक्तेपणामुळे ती वादात सापडली होती. कविताचे हेच गुण तिला बिग बॉसची स्पर्धक बनण्यात मदत करणार आहेत.

(Bigg Boss 14 Latest Update toofani seniors elimination)

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI