Bigg Boss 14 | कपडे मिळवण्यासाठी निक्की तंबोलीचा हंगामा, सिद्धार्थ शुक्लाचा मध्यस्थीचा प्रयत्न!

पहिल्या दिवसापासून वादाला सुरुवात केलेल्या निक्कीने चौथ्या दिवशीही घरात कपड्यांवरून हंगामा (Drama over cloths) केला आहे.

Bigg Boss 14 | कपडे मिळवण्यासाठी निक्की तंबोलीचा हंगामा, सिद्धार्थ शुक्लाचा मध्यस्थीचा प्रयत्न!
Harshada Bhirvandekar

|

Oct 08, 2020 | 10:58 AM

मुंबई : बिग बॉसच्या (Bigg Boss 14) घरातील हंगामे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सलग चौथ्या दिवशी घरात गदारोळ पाहायला मिळाला. एकीकडे तूफानी सिनिअर्स नव्या स्पर्धकांना त्रास देण्याची संधी सोडत नाहीयत. तर, दुसरीकडे नव्या स्पर्धकांनीही गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. नव्या स्पर्धकांपैकी एक, निक्की तंबोलीमुळे (Nikki Tamboli) संपूर्ण घर हैराण झाले आहे. पहिल्या दिवसापासून वादाला सुरुवात केलेल्या निक्कीने चौथ्या दिवशीही घरात कपड्यांवरून हंगामा (Drama over cloths) केला आहे. (Bigg Boss 14 Nikki Tamboli drama over cloths)

निक्कीमुळे सगळेच स्पर्धक हैराण

तूफानी सिनिअर हीना खान नियमांनुसार, रोज घरातल्यांना 7 वस्तू देते. यावेळी हीनाने वस्तूंची यादी मागितली असता, निक्की तंबोलीने (Nikki Tamboli) तिच्याकडे दोन कपड्यांची मागणी केली. तिच्या या मागणीमुळे घरातील इतर स्पर्धक संतापले. निक्कीच्या रोज काहीना काही मागण्या असतात, आज तर थेट दोन कपडे मागितले. यामुळे घरतल्या इतर व्यक्तींना काही मागता येत नाही. निक्कीने एक दिवस तरी इतर स्पर्धकांना संधी द्यावी, असे म्हणत इतर स्पर्धकांनी तिच्यावरील रोष व्यक्त केला. तर, इथे माझे कोणीही मित्र-मैत्रिणी नाहीत, मी कशाला त्याग करावा?, असे म्हणत निक्कीने घरातल्यांची मागणी धुडकावून लावली.

संतापलेल्या पवित्राचा कडक ‘पवित्रा’!

निक्कीच्या मागण्यांमुळे हैराण झालेल्या स्पर्धकांपैकी एक, पवित्रा पुनिया थेट तिला चपलेने मारण्याची इच्छा बोलून दाखवली. याशिवाय पवित्राने निक्कीविरोधात घरातील इतरांना भडकवण्यास सुरुवात केली आहे. तिच्या या प्रयत्नांना यशदेखील आले. पवित्राने कागाळ्या केल्याने एजाज खान निक्की तंबोलीवर प्रचंड संतापला आहे. संपूर्ण भागात तो तिच्यावर राग व्यक्त करताना दिसणार आहे. (Bigg Boss 14 Nikki Tamboli drama over cloths)

घरातल्यांच्या मदतीला धावून आला निशांत मलकानी

निक्कीच्या हंगाम्यानंतर गौहर खानने, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कोणालाही जेवण मिळणार नसल्याची घोषणा केली. घरातल्यांवर ओढवलेले संकट बघून अभिनेता निशांत मलकानीने यादीतून माघार घेतली. ‘मी आज काहीच मागणार नाही, निक्कीला तिच्या वस्तू द्या. परंतु, तिने उद्या काहीच मागायचे नाही’, असे म्हणत निशांतने त्याची वस्तू मागण्यास नकार दिला. परंतु, निक्कीला दोन वस्तू मिळण्यावर घरातले अजूनही नाराज आहेत.

निक्कीचा हंगामा कशासाठी?

निक्की तंबोलीने (Nikki Tamboli) मागितलेल्या कपड्यांमध्ये तिच्या एक्स-बॉयफ्रेंडची शॉर्ट्स होती. ती हवी असल्याने निक्कीने संपूर्ण घरात गोंधळ (Drama Over Cloths) घालायला सुरुवात केली होती. हे सगळे प्रकरण पाहिल्यानंतर तूफानी सिनिअर सिध्दार्थ शुक्लाने निक्कीची समजूत काढली. सिद्धार्थच्या सांगण्यावरून निक्की तंबोलीने अखेर आपला हट्ट सोडला.

(Bigg Boss 14 Nikki Tamboli drama over cloths)

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरात अभिनेता सिद्धार्थ शुक्ला जखमी!

 पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात वाद, जास्मीन भसीन-निक्की तंबोलीमध्ये शाब्दिक चकमक

Bigg Boss 14: फक्त सलमान खानच नाही तर सिद्धार्थ शुक्लाची फी वाचून व्हाल थक्क!

PHOTO | Bigg Boss 14 House Tour | पहिल्यांदाच ‘बिग बॉस’च्या घरात रेस्टोरेंट, स्पा, थिएटर, मॉलचा समावेश!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें