Bigg Boss 14 | पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात वाद, जास्मीन भसीन-निक्की तंबोलीमध्ये शाब्दिक चकमक

सगळ्या स्पर्धकांची दणक्यात एंट्री झाल्यांनतर पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस 14’च्या घरात वादाची ठिणगी पडली आहे.

Bigg Boss 14 | पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात वाद, जास्मीन भसीन-निक्की तंबोलीमध्ये शाब्दिक चकमक

मुंबई : देशातील सर्वात मोठा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ एकदा पुन्हा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. नवनवीन टास्क आणि वादांमुळे हा कार्यक्रम नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. सगळ्या स्पर्धकांची दणक्यात एंट्री झाल्यांनतर पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस 14’च्या घरात वादाची ठिणगी पडली आहे. निक्की तंबोली (Nikki Tamboli) आणि जास्मीन भसीन (Jasmin Bhasin) यांच्या दरम्यान शाब्दिक चकमक झाली आहे (Bigg Boss 14 Nikki Tamboli Jasmin Bhasin cat fight in house).

शनिवारी (3 ऑक्टोबर) बिग बॉसच्या 14व्या पर्वाला सुरुवात झाली. घरात प्रवेश केल्यापासूनच निक्की तंबोली आणि एजाज खानमध्ये छोटे छोटे खटके उडालेले पाहायला मिळाले. मात्र आजच्या (4 ऑक्टोबर) भागात  निक्की (Nikki Tamboli) आणि जास्मीनमध्ये (Jasmin Bhasin) जोरदार भांडण झालेले पाहायला मिळणार आहे. घरातील कामांची विभागणी ही या भांडणाचे कारण ठरणार आहे. कामांच्या विभागणी दरम्यान, भांडी घासण्याच्या कामावरून या दोघींमध्ये भांडण झाले आहे.

नखं खराब होतील, असे कारण देत निक्कीने घरातील भांडी घासण्यास नकार दिला आहे. त्यात जास्मीन निक्कीला सुरुवातीला थोडे सहकार्य करण्यास सांगते. मात्र ती काही केल्या ऐकत नाही. त्यानंतर एजाजही निक्कीला समजावताना दिसत आहे. मात्र, निक्की काही झाले तरी हे काम करण्यास तयार होत नाही. यामुळेच या दोघींमध्ये भांडण जुंपणार आहे. या भांडणानंतर दोघींची रडारड पाहायला मिळणार आहे. (Bigg Boss 14 Nikki Tamboli Jasmin Bhasin cat fight in house)

‘हे’ असणार ‘बिग बॉस 14’चे स्पर्धक

हिंदीतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा (Bigg Boss 14) 14वा सीजन सुरु झाला आहे. अभिनेता सलमान खानने या कार्यक्रमाची दणक्यात सुरुवात केली आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात एजाज खान, निक्की तंबोली, रुबीना दिलैक, अभिनव शुक्ला, जास्मीन भसीन (Jasmin Bhasin), निशांत सिंह मलकानी, शहजाद देओल, सारा गुरपाल, जान कुमार सानू, पवित्रा पुनिया आणि राहुल वैद्य यांची यंदाचे स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात दणक्यात एन्ट्री झाली आहे.

(Bigg Boss 14 Nikki Tamboli Jasmin Bhasin cat fight in house)

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14: फक्त सलमान खानच नाही तर सिद्धार्थ शुक्लाची फी वाचून व्हाल थक्क!

PHOTO | Bigg Boss 14 House Tour | पहिल्यांदाच ‘बिग बॉस’च्या घरात रेस्टोरेंट, स्पा, थिएटर, मॉलचा समावेश!

Bigg Boss 14 Grand Premier : ‘राधे माँ’ची बिग बॉसमध्ये एन्ट्री, बिग बॉससाठी प्रार्थना

Published On - 1:35 pm, Sun, 4 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI