Bihar election result 2020: बिहार विधानसभा निवडणूक निकालाला काहीसा उशीर लागण्याची शक्यता! काय आहे कारण?

बिहार विधानसभा निवडणूक निकालाला काहीसा उशीर लागण्याची शक्यता आहे. कोरोना संकटामुळे आखून देण्यात आलेल्या नियमावलीमुळे बिहार निवडणुकीचा निकाल लागण्यास उशीर होऊ शकतो.

Bihar election result 2020: बिहार विधानसभा निवडणूक निकालाला काहीसा उशीर लागण्याची शक्यता! काय आहे कारण?

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar assembly Eelection 2020) मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांचा JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महाआघाडी पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी बिहार विधानसभा निवडणूक निकालाला काहीसा उशीर लागण्याची शक्यता आहे. कोरोना संकटामुळे आखून देण्यात आलेल्या नियमावलीमुळे बिहार निवडणुकीचा निकाल लागण्यास उशीर होऊ शकतो. (The final results of the Bihar Assembly elections are likely to be delayed)

अंतिम निकालास उशीर लागण्याची शक्यता का?

1. मतमोजणी केंद्रांच्या संख्येत वाढ

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षीच्या निवडणूक निकालासाठी 2 ते 3 तासांचा उशीर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मतदानासाठी एकूण 1 लाख 6 हजार 526 मतदान केंद्र उभारण्यात आले होते. जे मागील निवडणुकीच्या तुलनेत 63 टक्के अधिक होते. 2015 च्या निवडणुकीत 65 हजार 367 मतदान केंद्र होते. यंदा मतदान केंद्रांची संख्या वाढवल्यामुळं ईव्हीएम मशीनच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणूक निकालाच्या अंतिम घोषणेला उशीर लागण्याची शक्यता आहे.

2. VVPAT सोबत निकालाची पडताळणी

निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार एखाद्या उमेदवारानं मतमोजणीवर आक्षेप घेतला तर अशास्थितीत ईव्हीएम सील केलं जाईल. त्यानंतर मतांच्या संख्येची VVPAT सोबत पडताळणी करुन पाहण्यात येईल. असं झाल्यास अंतिम निकाल हाती येण्यास उशीर लागू शकतो

3. आधी टपाली मतांची मोजणी

मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु झाली आहे. नियमानुसार सुरुवातीला टपाली मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी सुरु करण्यात आली आहे. ईव्हीएमच्या एका राऊंडला 15 ते 20 मिनिटे लागतात. त्यामुळेही अंतिम निकाल येण्यास उशीर लागू शकतो.

RJD नेते तेजप्रताप यादव पिछाडीवर

बिहार विधानसभा निवडणूक निकालात आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार RJDचे नेते आणि माजी मंत्री तेजप्रताप यादव यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. तेजप्रताप यादव समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तेजप्रताप यादव यांच्या विरोधात जनता दलाचे राजकुमार राय निवडणूक लढवत आहेत. राजकुमार राय यांनी तेजप्रताप यादव यांच्यावर 1400 मतांची आघाडी मिळवली आहे. तेजप्रताप यादव त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

संबंधित बातम्या:

तरुण नेत्याचं केंद्रीय सत्तेला आव्हान, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू; राऊतांनी भाजपला घेरले

Nitish Kumar News and Updates: बिहारमध्ये पुन्हा NDAचं सरकार आल्यास नितीश कुमार नवा विक्रम रचणार!

The final results of the Bihar Assembly elections are likely to be delayed

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI