बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या वाढदिवसानिमित्त जोरदार पोस्टरबाजी, भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख!

| Updated on: Nov 09, 2020 | 10:28 AM

बिहार विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल आहे. तत्पूर्वी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अनेक संस्थांचे एक्झिट पोल प्रसिद्ध झाले. त्यात RJD आणि काँग्रस महाआघाडीला सत्ता मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या वाढदिवसानिमित्त जोरदार पोस्टरबाजी, भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख!
तेजस्वी यादव यांचा आज 31 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त RJDच्या कार्यकर्त्यांनी बिहारमध्ये अनेक ठिकाणी पोस्टर लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Follow us on

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी म्हणजे उद्या लागणार आहे. तत्पूर्वी बिहारमध्ये अनेक ठिकाणी RJD नेते तेजस्वी यादव यांचे पोस्टर झळकले आहेत. महत्वाची बाब म्हणजे त्यावर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. तेजस्वी यादव यांचा आज 31 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त RJDच्या कार्यकर्त्यांनी बिहारमध्ये अनेक ठिकाणी पोस्टर लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Mention of Tejaswi Yadav as the future Chief Minister, banner waving of RJD arty workers)

बिहार विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल आहे. तत्पूर्वी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अनेक संस्थांचे एक्झिट पोल प्रसिद्ध झाले. त्यात RJD आणि काँग्रस महाआघाडीला सत्ता मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तेजस्वी यादव हे RJDचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहे. त्यात आज तेजस्वी यांचा वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये आज RJD कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केलेली पाहायला मिळत आहे. पोस्टरवर तेजस्वी यादव यांचा भावी मुख्यमंत्री आणि कृष्णावतार असा उल्लेख केला आहे.

एक्झिट पोलमधून महाआघाडीला बहुमताचा अंदाज

विविध एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना झटका बसण्याची शक्यता आहे. ‘Tv9 च्या महाएक्झिट पोल’नुसार बिहारच्या नागरिकांनी यावेळी मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोजपचे दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे सुपुत्र चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाला आव्हान देत ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला कोणताही विरोध नाही. मी त्यांचा हनुमान आहे, अशी भूमिका चिराग पासवान यांनी घेतली होती. त्यांच्या लोकजनशक्ती पार्टीने केवळ संयुक्त जनता दलाविरोधात उमेदवार उभे केले आहेत. नितीश कुमार आणि चिराग पासवान यांच्यातील लढाईचा फायदा महागठबंधनला मिळण्याची शक्यता आहे.

Tv9 महाएक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 110 ते 120

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 115 ते 125

लोजप – 3 ते 5

अन्य – 10 ते 15

 

ABP न्यूज -सीव्होटरचा एक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 104 ते 128

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 108 ते 131

 

रिपब्लिक टीव्ही- जनकी बातचा एक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 91 ते 117

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 136 ते 138

 

टाईम्स नाऊ-सीव्होटरचा एक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 116

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 120

लोजप – 1

अन्य – 6

संबंधित बातम्या:

Bihar Exit Poll: ‘तेजस्वी’ लाटेचा चिराग पासवान यांनाही मोठा फटका; ‘किंगमेकर’ का होऊ शकले नाहीत?; पाहा एक्झिट पोलचे आकडे

Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमार यांना झटका, 63 टक्कांकडून सत्ता बदलाला पसंती

Bihar Exit Poll 2020 : ‘या त्रिसूत्रीने बिहार निवडणुकीचे गणित बदलले?, नितीशकुमारांचं भावनिक कार्डही चाललं नाही?; एक्झिटपोलचा अंदाज

Mention of Tejaswi Yadav as the future Chief Minister, banner waving of RJD party workers