Bihar Exit Poll: ‘तेजस्वी’ लाटेचा चिराग पासवान यांनाही मोठा फटका; ‘किंगमेकर’ का होऊ शकले नाहीत?; पाहा एक्झिट पोलचे आकडे

तेजस्वी यादव यांनी संपूर्ण निवडणुकीत विकास आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांना हात घातल्याने जेडीयू, भाजपसह सर्वच राजकीय पक्षांना फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकीत लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांना सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून दिसत आहे.

Bihar Exit Poll: 'तेजस्वी' लाटेचा चिराग पासवान यांनाही मोठा फटका; 'किंगमेकर' का होऊ शकले नाहीत?; पाहा एक्झिट पोलचे आकडे
chirag Paswan tejashwi Yadav
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 10:10 PM

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत राजद नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात आघाडीचं सरकार बनण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेजस्वी यादव यांनी संपूर्ण निवडणुकीत विकास आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांना हात घातल्याने जेडीयू, भाजपसह सर्वच राजकीय पक्षांना फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकीत ‘किंगमेकर’ बनण्याचे स्वप्न पाहणारे लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांना सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून दिसत आहे. (chirag paswan could not become kingmaker in bihar?)

बिहार विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळत नसल्याने लोजपा नेते चिराग पासवान यांनी एनडीएतून फारकत घेऊन सवतासुभा मांडला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण निवडणुकीत आपण भाजपची बी टीम असल्यासारखा प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे मार्गदर्शक असून निवडणुकीनंतर आम्ही भाजपसोबतच जाणार असल्याचंही त्यांनी वारंवार जाहीर केलं. त्यामुळे केवळ नितीशकुमार यांच्या जेडीयूची मतं खाण्यासाठी चिराग पासवान निवडणूक लढवत असल्याचं चित्रं निर्माण झालं. शिवाय निवडणुकीत ठोस अजेंड्याचा अभाव, समस्या आणि मुद्द्यांवरून बिहारी जनतेत विश्वास निर्माण करण्यात चिराग पासवान कमी पडल्याने त्यांच्या पदरी अपयश येत असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

रामविलास पासवानांची कमतरता जाणवली

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळी रामविलास पासवान यांचं निधन झालं. त्यामुळे पक्षाचा मोठा आधारच गेला. त्यामुळे निवडणुकीतील जातीय, सामाजिक समीकरणं जुळवणारा नेताच नसल्याने चिराग यांची रणनीती चुकली. शिवाय चिराग यांची ही पहिलीच निवडणूक त्यात भाजपची बी टीम असल्याचं निर्माण झालेलं चित्रं आणि अनुभवी नेत्यांची कमतरता या सर्व मुद्दयांमुळेही चिराग यांना फटका बसताना दिसत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

त्या तुलनेत समोर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, जेडीयूकडून नितीशकुमार, काँग्रेसकडून राहुल गांधी तर राजदकडून तेजस्वी यादव सारखी मातब्बर मंडळी प्रचारात ठाण मांडून उभी होती. त्याचाही चिराग यांना फटका बसल्याचं दिसून येतंय. पोल ऑफ एक्झिट पोल्सनुसार चिराग यांच्या लोजपाला अवघ्या 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.

न्यूज24- सी व्होटरनुसार लोजपाला १, रिपब्लिक जननुसार लोजपाला 5-8 जागा मिळण्याची शक्यता आहे. टाइम्स नाऊच्या सर्व्हेनुसार लोजपाला 1-3 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे चिराग पासवान यांचं किंगमेकर होण्याचं आणि त्रिशंकू परिस्थितीत भाजपला पाठिंबा देऊन सत्तेची पदं पदरात पाडून घेण्याचं स्वप्न भंगताना दिसत आहे.

कोणत्या टप्प्यात किती मतदान?

  • बिहारमध्ये एकूण तीन टप्प्यात मतदान झालं.
  • 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी मतदान झालं.
  • दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबरला 94 जागांसाठी मतदान झालं.
  • तर तिसऱ्या टप्प्यात आज 7 नोव्हेंबर रोजी 78 जागांवर मतदान झालं.
  • एकूण जागा: 243
  • बहुमत : 122 (chirag paswan could not become kingmaker in bihar?)

संबंधित बातम्या:

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर लालूंची प्रकृती बिघडली, मानसिक तणाव वाढला

‘या त्रिसूत्रीने बिहार निवडणुकीचे गणित बदलले?, नितीशकुमारांचं भावनिक कार्डही चाललं नाही?; एक्झिटपोलचा अंदाज

Bihar Election Exit Poll : तेजस्वी तळपले, मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती

(chirag paswan could not become kingmaker in bihar?)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.