बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर लालूंची प्रकृती बिघडली, मानसिक तणाव वाढला

लालू प्रसाद यादव सतत निवडणुकीबाबत विचार करत असतात. निवडणुकीच्या विचारांमुळे ते खाण्या-पिण्याकडेही लक्ष देत नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे (Lalu Prasad Yadav health deteriorates due to Mental stress increase).

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर लालूंची प्रकृती बिघडली, मानसिक तणाव वाढला
जामिन मिळून 10 दिवस उलटल्यानंतरही लालूंची तुरुंगातून सुटका नाही
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 8:52 PM

रांची : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर रांची येथील रिम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती काही दिवसांपासून स्थिर होती. मात्र, आज (7 नोव्हेंबर) अचानक प्रकृती पुन्हा खालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डायबिटीजमुळे क्रिएटिनिन लेव्हल वाढली आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे (Lalu Prasad Yadav health deteriorates due to Mental stress increase).

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अशीच खालावत गेली तर काही दिवसांनी डायलिसीस करावी लागेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लालू यांच्या प्रकृतीबाबतचा रिपोर्ट हायकोर्टाने मागितली होता. त्यानंतर रिम्स रुग्णालयाने आज लालू यांच्या प्रकृतीचा रिपोर्ट हायकोर्टाला दिला.

75 टक्के किडनी निकामी

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव यांची फक्त 25 टक्के किडनी काम करत आहे. जवळपास 75 टक्के किडनी निकामी झाली आहे. लालू यांची प्रकृती आणखी बिघडली तर डायलिसिस करावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

लालू यादव यांना रुग्णालयात दाखल केल्यादिवशी त्यांची किडनी 3बी स्टेजवर होती. मात्र, आता ती स्टेज 4 वर पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षात इन्सुलिन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे किडनीने चांगलं काम केलं. मात्र, आता पुन्हा त्यांची किडनी निकामी होत चालली आहे. त्यामुळे डॉक्टरांना चिंता वाढली आहे. कोरोना संसर्गाचा धोका नसता तर लालू यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल केलं असतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

मानसिक तणावामुळे प्रकृती बिघडली

डॉक्टरांच्या मते, मानसिक तणाव वाढल्यामुळे लालू प्रसाद यादव यांची प्रकृती जास्त बिघडली. मानसिक तणाव हेच प्रमुख कारण असल्याचा डॉक्टरांचा दावा आहे. लालू यादव सतत निवडणुकीबाबत विचार करत असतात. निवडणुकीच्या विचारांमुळे ते खाण्या-पिण्याकडेही लक्ष देत नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे (Lalu Prasad Yadav health deteriorates due to Mental stress increase).

दरम्यान, प्रकृती बिघडत असल्याने लालू प्रसाद यादव यांच्या जामीनाची तारीख पुढे ढकलली आहे. त्यांना 6 नोव्हेंबर रोजी जामीन मिळण्याची शक्यता होती. मात्र, आता हायकोर्टाने 27 नोव्हेंबरला पुढील सुनावणी असल्याचं सांगितलं आहे.

23 डिसेंबर 2017 पासून लालू जेलमध्ये

चारा घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर लालू प्रसाद यादव 23 डिसेंबर 2017 पासून जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. दरम्यान, 17 मार्च 2018 रोजी प्रकृती बिघडल्याने त्यांना रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हायकोर्टाने त्यांना उपचारासाठी 11 मे 2018 रोजी सहा आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला होता. हा जामीन 14 ऑगस्ट त्यानंतर 27 ऑगस्ट 2018 पर्यंत वाढवण्यात आला होता. कोर्टाने 30 ऑगस्ट 2018 रोजी लालू यांना कोर्टात सरेंडरचे आदेश दिले होते. त्यानंतर लालू रिम्स रुग्णालयात दाखल झाले.

लालू प्रसाद यांच्यावर सध्या रिम्स रुग्णालयाच्या मालकाच्या बंगल्यात उपचार सुरु आहेत. कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात त्यांना रुग्णालयातून बंगल्यात शिफ्ट करण्यात आलं होतं. लालू यादव यांना डायबेटिजसह आणखी 11 शारीरीक व्याधी आहेत. यामध्ये ब्लड प्रेशर, किडनी यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

Bihar Election Exit Poll : तेजस्वी तळपले, मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती

Bihar Election Exit Poll Live : NDA ला फटका बसण्याची चिन्हं, महागठबंधन झेप घेण्याचे संकेत, ‘TV9 महाएक्झिट पोल’चे अंदाज

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.