AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेज प्रतापांकडे 15 लाखांची बाईक, राजद नेत्याकडे एक किलो सोनं, बिहारच्या उमेदवारांची डोळे विस्फारणारी संपत्ती

तेज प्रताप यादव यांच्याकडे 15.46 लाख रुपये किमतीची सीबीआर 1000 आरआर बाईक आहे. तसेच, त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू कारही आहे.

तेज प्रतापांकडे 15 लाखांची बाईक, राजद नेत्याकडे एक किलो सोनं, बिहारच्या उमेदवारांची डोळे विस्फारणारी संपत्ती
| Updated on: Oct 26, 2020 | 12:03 PM
Share

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव हसनपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. राजदच्या तिकीटावर गेल्या वेळी महुआतून विजयी झाले होते, मात्र यंदा त्यांनी आपला मतदारसंघ बदलला. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 2.83 कोटी रुपयांची संपत्ती आहे. (Bihar Polls Tej Pratap Yadav and other candidates assets in affidavit)

तेज प्रताप यादव यांच्याकडे 15.46 लाख रुपये किमतीची सीबीआर 1000 आरआर बाईक आहे. तसेच, त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू कारही आहे. या आलिशान कारची किंमत 29.43 लाख रुपयांच्या घरात आहे. तेज प्रताप यांच्याकडेही 4.26 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 2.83 कोटी रुपयांची आहे.

अविनाशकुमार विद्यार्थी – एक किलो सोने

राजदचे उमेदवार अविनाशकुमार विद्यार्थी मुंगेर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे 44.51 लाख रुपये किमतीचे एक किलो सोने, तर 14.98 लाखांची 25 किलो चांदी आहे. इतकंच नाही, तर 3.90 लाख रुपयांची 13 कॅरेट हिऱ्याची अंगठीही आहे. यासह 32 लाखांची टोयोटा फॉर्च्युनर, 9.15 लाखाची फोर्ड फिगो, साडेसात लाखांची महिंद्रा स्कॉर्पिओ, 75 हजारांची टीव्हीएस स्कूटरही आहे. एवढ्यातच तुम्ही चकित झाला असाल, तर थांबा. त्यांच्याकडे 1.8 लाख रुपये किमतीची रायफलही आहे.

पुष्पम प्रिया चौधरी – 14 लाखांच्या दोन अंगठ्या

बिहारच्या राजकारणाशी परिचित असलेल्यांना पुष्पम प्रिया चौधरी यांचे नाव माहित असेलच. स्वत:ला मुख्यमंत्रिपदाची दावेदार घोषित केल्याने त्या चर्चेत आल्या. प्लुरल्स पक्षाकडून त्या दोन जागांवर निवडणूक लढवत आहेत. बांकीपूर आणि बिस्फी. त्यांच्याकडे एकूण 15.92 लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यापैकी तब्बल 14 लाखांच्या तर दोन अंगठ्या आहेत. नीलमची अंगठी 5 लाखांची आहे. दुसरी पुष्कराजची अंगठी 9 लाखांची आहे. पुष्पम प्रिया चौधरी यांच्याकडे रोख रक्कम 8 हजार रुपये आहे.

अनंतकुमार सिंग – 38 खटले असलेला उमेदवार

अनंतकुमार सिंग सध्या तुरुंगात असून मोकामा मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहेत. मागील निवडणुकीत ते अपक्ष विजयी झाले होते. मात्र यावेळी ते राजदच्या तिकिटावर उमेदवार आहेत. त्यांना बाहुबली नेता मानले जाते. 38 खटले दाखल असलेले ते एकमेव उमेदवार आहेत. त्यांना प्राण्यांची प्रचंड आवड आहे. हत्ती, घोडा, गाय, म्हशी असे 1.90 लाख किमतीचे पशुधन आहे. 32.52 लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर सिग्मा, 25.33 लाख रुपयांची इनोव्हा क्रिस्टा, सहा लाखांची महिंद्रा स्कॉर्पिओ आणि 31.60 लाखांचे दागिने अशी त्यांची संपत्ती. (Bihar Polls Tej Pratap Yadav and other candidates assets in affidavit)

संबंधित बातम्या :

तेज प्रताप यादवांना जेडीयूचा शह, दुरावलेली पत्नी ऐश्वर्याला विरोधात तिकीट देण्याचा मेगाप्लॅन

(Bihar Polls Tej Pratap Yadav and other candidates assets in affidavit)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.