AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitish Kumar cabinet : बिहारमध्ये भाजप-जेडीयूचे 7-7 मंत्री, भाजपच्या खात्यात दोन उपमुख्यमंत्रिपदं

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या कॅबिनेटसाठी पहिल्या टप्प्यात जेडीयू आणि भाजपचे 7-7 मंत्री शपथ घेतील. (BJP and JDU final formula of Seven Cabinet Minister for Nitish Kumar Cabinet )

Nitish Kumar cabinet : बिहारमध्ये भाजप-जेडीयूचे 7-7 मंत्री, भाजपच्या खात्यात दोन उपमुख्यमंत्रिपदं
| Updated on: Nov 16, 2020 | 11:58 AM
Share

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळालं आहे. जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नितीश कुमार यांच्यासोबत जेडीयूचे 7, भाजपचे 7, हिंदुस्थान आवाम मोर्चाचा 1 आणि विकासशील इन्सान पार्टीचा 1 असे एकूण 16 मंत्री शपथ घेऊ शकतात. शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. (BJP and JDU final formula of Seven Cabinet Minister for Nitish Kumar Cabinet )

बिहार विधानसभेची सदस्य संख्या 243 असून मंत्रिमंडळात एकूण 36 मंत्र्यांचा समावेश करता येऊ शकतो. पहिल्या टप्प्यात 16 मंत्र्यांना शपथ देण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. जेडीयूकडून बिजेंद्र यादव, अशोक चौधरी, विजय चौधरी, श्रवण कुमार आणि लेसी सिंह यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

भाजपकडून तारकिशोर प्रसाद, रेणू देवी, प्रेम कुमार, नन्दकिशोर यादव, कृष्ण ऋषि, विजय सिन्हा, राणा रणधीर सिंह, प्रमोद कुमार, रामनारायण मंडल,नीतीश मिश्रा,नितिन नवीन, सम्राट चौधरी, संजीव चौरसिया यांची नावं आघाडीवर आहेत.

विकासशील इन्सान पार्टीचे मुकेश सहनी आणि  हिंदुस्थान आवाम मोर्चाचे  संतोष मांझी शपथ घेणार आहेत. (BJP and JDU final formula of Seven Cabinet Minister for Nitish Kumar Cabinet )

भाजपला दोन उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी?

बिहारमध्ये भाजपनं चेहरा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 10 वर्षांहून अधिक काळ उपमुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या सुशीलकुमार मोदी यांना डच्चू देण्यात आलाय. भाजपने तारकिशोर प्रसाद यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन उपमुपख्यमंत्री देण्याचा निर्णय झाल्यास रेणू देवी यांचं नाव आघाडीवर आहे.

भाजपने रविवारी तारकिशोर प्रसाद यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. रेणूदेवी यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सुशीलकुमार मोदी यांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

तारकिशोर प्रसाद कोण आहेत? भाजपने उपमुख्यमंत्रीपदाची संधी दिलेले तारकिशोर प्रसाद कटिहार विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. सलग चार टर्म ते या मतदारसंघातून विजयी झालेत. कटिहार सोबत पुर्णिया, भागलपूर या जिल्ह्यांमध्येही ते लोकप्रिय आहेत.

करोडपती तारकिशोर प्रसाद विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातील माहितीनुसार तारकिशोर प्रसाद करोडपती आहेत. त्याची एकूण संपत्ती 1.9 कोटी इतकी आहे. तारकिशोर बारावी पास आहेत. कटिहार विधानसभा मतदारसंघात त्यांनी राजदच्या डॉ. राम प्रकाश महतो यांचा पराभव केला.

तारकिशोर वैश्य समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. वैश्य समाज भाजपची वोट बँक मानली जाते. बिहारमध्ये वैश्य समाजातील एकूण 24 आमदार निवडून आले आहेत. त्यापैकी 15 आमदार भाजपकडून विजयी झालेत. तारकिशोर प्रसाद यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले आहे. सुशील कुमार मोदी यांचे निकटवर्तीय असल्यामुळे नितीश कुमार आणि तार किशोर प्रसाद यांच्यात चागंला समन्वय राहील, अशी अपेक्षा भाजप नेत्यांना आहे.

अतिमागास आणि महिलांना भाजपशी जोडण्याचा डाव

बिहार विधानसभा निवडणुकीत 74 जागा मिळवणाऱ्या भाजपची नजर अतिमागास समाजातील मतदार आणि महिलांवर आहे. रेणू देवी यांना संधी देऊन भाजप हे समीकरण प्रत्यक्षात उतरवू शकते. रेणूदेवी यांना उपमुख्यंमंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. बिहारमधील नोनिया, बिंद, मल्लाह, तुरहा या अतिमागास जातींमधील मतदारांमध्ये भाजपची विचारसरणी रुजवण्यासाठी भाजपकडून रेणू देवी यांना संधी देण्यात आलीय.

संबंधित बातम्या:

नितीश कुमार सातव्यांदा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; भाजपचे चाणक्य अमित शाह सोहळ्याला उपस्थित राहणार

बिहारमध्ये भाजपचा चेहरा कोण? उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘हे’ 4 चेहरे आघाडीवर

(BJP and JDU final formula of Seven Cabinet Minister for Nitish Kumar Cabinet )

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....