AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उध्दव ठाकरे यांना कालच्या सभेत फारच केविलवाणा “न्याय” मिळाला.. भाजपा नेत्यांची घणाघाती टीका

रविवारी 'इंडिया आघाडी'ची मुंबईत भव्य सभा आयोजित करण्यात आली. ता याच सभेतील भाषणावारून भाजपाने उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. भाजप नेते ॲड. आशिष शेलार तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रदेशखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला चढवला.

उध्दव ठाकरे यांना कालच्या सभेत फारच केविलवाणा न्याय मिळाला.. भाजपा नेत्यांची घणाघाती टीका
| Updated on: Mar 18, 2024 | 12:02 PM
Share

मुंबई | 18 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्वच पक्ष कंबर कसून तयारी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तयारी सुरू केली असून रविवारी ‘इंडिया आघाडी’ची मुंबईत भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदींवर कडाडून टीका केली. मात्र आता याच सभेतील भाषणावारून भाजपाने उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. भाजप नेते ॲड. आशिष शेलार तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रदेशखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला चढवला. ‘ आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला सभेत जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली. तर “हिंदुत्वाला केले तडीपार” हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच “शिवतीर्थावर” सभा घेण्यात आली होती का ? असा सवाल विचारत आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला.

उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत ?

X (पूर्वीच ट्विट) या सोशल मीडिया अकाऊंटवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक क्लिप शेअर करत पोस्टही लिहीली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे आधीचे भाषण आणि रविवारचे भाषण यांची तुलना करून दाखवण्यात आली. ‘ आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला आज जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते. मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत? बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादी शिवसैनिक आणि स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही.’ अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

“हिंदुत्वाला केले तडीपार” हे दाखवून देण्यासाठीच “शिवतीर्थावर” सभा घेण्यात आली होती का ? शेलार यांचा सवाल

तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला. त्यांचे ट्विट त्यांच्याच शब्दात जसेच्या तसे…

आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन… आपल्याला हवे तेवढे… शिवतीर्थावर भाषण करणारे.. ◆श्रीमान उध्दव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा “न्याय” मिळाला ? ◆भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का? ◆भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का ? ◆स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारका समोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल “मर्दा”सारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का ? ◆ हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने “हिंदुत्वाला केले तडीपार” हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच “शिवतीर्थावर” सभा घेण्यात आली होती का? ◆सभा एक झालीये.. पण प्रश्न अनेक निर्माण करुन गेली.. अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले.

एवढंच नव्हे तर ‘ काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची “मशाल”, आता खंजीर, वाघ, मर्द..कोथळा.. अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल!! ‘ अला चोलाही आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Follow Us
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...