Bihar Election Result | बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, भाजप एससी मोर्चाच्या अध्यक्षांची मागणी

महाराष्ट्राच्या धरतीवर बिहारमध्ये देखील मुख्यमंत्री कुणाचा होणार यावरुन वेगवेगळी मतं व्यक्त व्हायला सुरुवात झाली आहे.

Bihar Election Result | बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, भाजप एससी मोर्चाच्या अध्यक्षांची मागणी
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 4:37 PM

पाटणा : महाराष्ट्राच्या धरतीवर बिहारमध्ये देखील मुख्यमंत्री कुणाचा होणार यावरुन वेगवेगळी मतं व्यक्त व्हायला सुरुवात झाली आहे. एनडीएकडून निवडणुकीआधी नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. मात्र, आता जेडीयूच्या तुलनेत भाजपचे जास्त उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसताच भाजपच्या काही नेत्यांनी आपला मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे बिहार एससी मोर्चाचे अध्यक्ष अजित चौधरी यांनी भाजपच्या जास्त जागा असल्याने भाजपचाच मुख्यमंत्री व्हावं, असं मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचं म्हटलं (BJP SC Front President Ajit Chaudhari demand BJP CM amid Bihar Election Result ).

अजित चौधरी म्हणाले, “भाजपच्या जास्त जागा असल्याने भाजपचा मुख्यमंत्री व्हायला हवा. ही माझी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. बिहारच्या भविष्यासाठी भाजपचा एक चेहरा अधिक मजबूत करायला हवा. असं असलं तरी बिहारचा प्रत्येक कार्यकर्ता भाजपच्या नेत्यांच्या निर्णयाचं पालन करतात. मी देखील त्या निर्णयापासून वेगळा नाही. मी केवळ माझी आणि कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली आहे.”

चौधरी यांच्या या विधानानंतर बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार की जेडीयूचे नितीश कुमार मुख्यमंत्री होणार याची चर्चा सुरु झाली आहे. विरोधकांनी भाजपवर धोका देणारा आणि मित्रपत्रांना संपवणारा पक्ष अशी घणाघाती टीकाही केली आहे. यानंतर भाजपने बिहारमध्ये नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील असं सांगितलंय. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, “अजित चौधरी यांनी व्यक्त केलेलं मत त्यांचं वैयक्तिक मत आहे. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहांनी याअगोदरच स्पष्ट केलंय की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील.”

संबंधित बातम्या :

Nitish Kumar LIVE News and Updates: नितीश कुमार यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नालंदा जिल्ह्यात NDA आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत

Tejashwi Yadav LIVE News and Updates: तेजस्वी यादवांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंगणार? ‘एनडीए’चे कमबॅक, महागठबंधनला टाकले मागे

Bihar Election Result 2020 LIVE | जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची चिन्हं, लोजपसोबत 2005 पासूनच्या संघर्षाचा फटका?

संबंधित व्हिडीओ :

BJP SC Front President Ajit Chaudhari demand BJP CM amid Bihar Election Result

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.