Sushant Singh Rajput | सुशांतपूर्वी आत्महत्या केलेले कलाकार, दिग्गजांच्या Suicide ने बॉलिवूड शोकसागरात

सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकूण देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुशांत अगोदर अनेक नामांकित आणि दिग्गज कलाकारांनी आत्महत्या करुन स्वत:चं आयुष्य संपवलं आहे (Bollywood actor-actress suicide before sushant singh rajput).

Sushant Singh Rajput | सुशांतपूर्वी आत्महत्या केलेले कलाकार, दिग्गजांच्या Suicide ने बॉलिवूड शोकसागरात

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या 34 व्या वर्षी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांत बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक अभिनेता होता. मात्र, तरीदेखील त्याने आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपलं. सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकूण देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुशांत अगोदर अनेक नामांकित आणि दिग्गज कलाकारांनी आत्महत्या करुन स्वत:च आयुष्य संपवलं आहे (Bollywood actor-actress suicide before sushant singh rajput).

1. जिया खान

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘निशब्द’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री जिया खानने 4 जून 2013 रोजी आत्महत्या केली होती. जिया खानने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिने ‘गजनी’, ‘हाऊसफूल’ चित्रपटातही काम केलं होतं.

2. दिव्या भारती

नामांकित अभिनेत्री दिव्या भारतीने 1993 साली वयाच्या 19 व्या वर्षी आत्महत्या केली होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तिने एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येने संपूर्ण देशाला धक्का बसला होता.

3. गुरुदत्त

अभिनेते गुरुदत्त यांनीदेखील 1964 साली आत्महत्या केली होती. त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती.

4. सिल्क स्मिता

जयलक्ष्मी वदलपति उर्फ सिल्क स्मिता या अभिनेत्रीने 1996 साली गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वारंवार अपयश येत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं सिल्कने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.

5. प्रवीण बॉबी

नामांकित अभिनेत्री प्रवीण बॉबीनेदेखील 2005 साली आत्महत्या केली होती. आजारपण आणि एकटेपणाला वैतागून प्रवीण बॉबीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती.

6. राहुल दिक्षित छोट्या पडद्यावरील नामांकित अभिनेता राहुल दिक्षितने गेल्यावर्षी 30 जानेवारी रोजी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. राहुलने अनेक मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपट सृष्टीत काम करण्यासाठी तो जयपूरहून मुंबईत आला होता. त्याने प्रचंड संघर्ष करत छोट्या पडद्यावर आपली ओळख बनवली होती. मात्र, 30 जानेवीर 2019 रोजी त्याने नैराश्यात जावून आत्महत्या केली होती.

7. प्रित्युषा बॅनर्जी

‘बालिका वधू’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री प्रित्युर्षा बॅनर्जीने 1 एप्रिल 2016 रोजी आत्महत्या केली होती.

8. प्रेक्षा मेहता

‘क्राइम पेट्रोल’ मालिकेतील अभिनेत्री प्रेक्षा मेहताने 27 मे 2020 रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. प्रेक्षाने मध्यप्रदेशच्या इंदूर येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती.

(Bollywood actor-actress suicide before sushant singh rajput)

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput suicide | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

Sushant Singh Rajput suicide | सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त धोनी पचवू शकेल का? धोनीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

Published On - 4:26 pm, Sun, 14 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI